Mahavir Jayanti 2023 : भगवान महावीर जयंतीनिमित्त 'जीवन समृध्द' बनवण्याचे हे प्रेरणादायी 5 सूत्र

Mahavir Jayanti 2023 : आज महावीर जयंती जैन समुदायासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो, 4 एप्रिल 2023 रोजी जैन धर्मातील महान तीर्थंकराचा जन्मदिवस म्हणून Mahavir Jayanti 2023 साजरी केली जाते. जैन समुदायातील लोक या दिवशी जैन मंदिरात जाऊन भगवान महावीर यांनी केलेल्या योगदानाचे स्मरण करतात आणि त्यांची शिकवण नव्या पिढीला शिकवतात.  Mahavir Jayanti हा दिवस आनंदात व उत्साहात साजरा केला जातो.

महावीर जयंतीचे महत्त्व

जैन समुहातील लोकांमध्ये महावीर जयंतीला खूप महत्त्व आहे. हा दिवस भगवान महावीर यांना समर्पित आहे. महावीर जयंती हा जैन धर्मियांचा सर्वात मोठा सण आहे. जैन धर्माचे शेवटचे आध्यात्मिक गुरु (महावीर) यांना ओळखले जाते. 

भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 वे शेवटचे तीर्थकर होते, धर्मग्रंथानुसार त्यांचा जन्म इ.स.पू. 599 मध्ये  लिच्छवी घराण्याचे महाराज सिद्धार्थ आणि राणी त्रिशाला यांच्या पोटी बिहारमधील वैशाली कुंड या गावात झाला. 

भगवान महावीर यांचे बालपणीचे नाव वर्धमान होते, त्यांनी वयाच्या 30 व्या वर्षी भौतिक सुखाचा त्याग करून अध्यात्मिक जीवन स्वीकारले, त्यावेळी त्यांनी कठीण अशी बारा वर्ष तपश्चर्या केली, ज्याद्वारे त्यांनी आपल्या सर्व इंद्रियांवर विजय मिळवला होता. नंतर त्यांनी दिगंबर रूप स्वीकारले.त्यामुळे त्यांना महावीर या नावाने ओळख मिळाली. 

भगवान महावीरांनी समूहाला अहिंसा, सत्यनिष्ठा, पावित्र्य, आसक्ती नसावी, चोरी करू नये अशी विविध प्रकारची शिकवण दिली.

भगवान महावीर जयंतीनिमित्त 'जीवन समृध्द' बनवण्याचे हे प्रेरणादायी 5 सूत्र

शांती आणि अहिंसेचा संदेश जगाला देताना शांततामय सहजीवनाचा मार्ग दाखवणारे भगवान महावीर यांनी जगाला शिकवण दिली.

प्रत्येकाच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी या 5 सूत्रांची तुम्हाला मदत होईल, हे पाच सूत्र  तुम्ही आचरणात आणली तर तुमचे जीवन समृद्ध होईल

  1. सर्वांना हसतमुखाने भेटा, त्यामुळे आदर वाढतो
  2. आपली चूक मान्य करा, इतरांना माफ करा
  3. इतर मदत करतात, त्यांना धन्यवाद म्हणा
  4. इतरांची प्रशंसा करा, एखाद्याला प्रोत्साहनही द्या
  5. चांगले काही वाचा, स्वतःच्या आत डोकवा

महावीर जयंती शुभेछ्या संदेश - Happy Mahavir Jayanti 2023 Wishes

महावीर जयंती या आनंदाच्या दिवसानिमित्ताने तुमच्या प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना मेसेज पाठवून महावीर जयंतीच्या Mahavir Jayanti 2023 Wishes शुभेच्छाही देऊ शकता

हिंसा परमो धर्मः
धर्म हिंसा तथैव च:
महावीर जयंती निमित्त
जैन बांधवाना खूप खूप शुभेच्छा

शांती आणि अहिंसेचा संदेश जगाला देताना, 
शांततामय सहजीवनाचा मार्ग दाखवणारे, 
भगवान महावीर यांना जयंतीनिमित्त, 
विनम्र अभिवादन आणि सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

संपूर्ण जगाला अहिंसा, दया क्षमा, शांती, मैत्री,
जगा आणि जगू द्या हा
संदेश देणारे भगवान महावीर
यांना आज जयंती निमित्त अभिवादन.
सर्वांना मनापासून शुभेच्छा..!

आत्मा एकटा येतो
आणि एकटा जातो,
ना त्याला कोणी आधार देत
ना कोणी मित्र बनतो.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

रागावर शांतीने विजय मिळवा,
दुष्टांनवर दयाळूपणाने विजय मिळवा,
आणि असत्यावर सत्यांनी विजय मिळवा!
महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

सिद्धांचे सार, आचार्यांचा सहवास,
ऋषींचा सहवास, अहिंसेचा प्रचार,
हे भगवान महावीरांचे सार आहे.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

तुमच्या आत्म्यापलीकडे कोणीही शत्रू नाही.
खरे शत्रू तुमच्या आत राहतात.
ते शत्रू म्हणजे क्रोध, अभिमान, लोभ, आसक्ती आणि द्वेष.
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

लाखो शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा, 
स्वतःवर विजय मिळवणे चांगले आहे. 
महावीर जयंतीच्या शुभेच्छा!

ज्याचे मन निरंतर धर्मरत असते
त्याला देव देखील नमस्कार करतो.”
असा महान संदेश देणाऱ्या
भगवान महावीर यांच्या जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा!!

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                            

Previous Post Next Post