मोठी बातमी ! 'आरटीई' प्रवेशाचा निकाल उद्या होणार जाहीर, तुमच्या अर्जाची स्थिती येथे पहा

RTE Lottery Result 2023 : 'आरटीई' 25 टक्के निकालाची राज्यातील सर्वच पालक वाट पाहत आहे, यंदा नवीन शैक्षणिक वर्षातील 2023 24 प्रवेश पक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी RTE ची प्रक्रिया जानेवारी महिन्यातच सुरु केली आहे, आता 'आरटीई' लॉटरी च्या पहिल्या यादीची प्रतीक्षा संपली असून, RTE Lottery Result 2023 24 Date Maharashtra उद्या (बुधवारी) सकाळी 11 वाजता निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023 24

RTE Lottery Result

शिक्षण हक्क (RTE Act 2009) च्या कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर, आर्थिक व वंचित घटकातील बालकांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो, पुढील शैक्षणिक वर्ष 2023 24 च्या प्रवेश प्रक्रिया आता अंतिम टप्यात आली आहे. 

राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर

'आरटीई' 25 टक्के अंतर्गत यावर्षी 1 लाखापेक्षा अधिक बालकांना मिळणार प्रवेश

महाराष्ट्रातून RTE 25 टक्के राखीव जागांसाठी 3 लाख 54 हजार 463 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे, मात्र महाराष्ट्र राज्यात आरटीई अंतर्गत 1 लाख 1 हजार 969 राखीव जागा आहे, या जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेश मिळणार आहे.

'आरटीई' लॉटरी ची पहिली यादी कोठे पहावी?

'आरटीई'  अंतर्गत ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले असणार आहे, त्यांच्यासाठी उद्या पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे, त्यानंतर सुद्धा जर RTE अंतर्गत जागा रिक्त राहिल्यास दुसरी यादी जाहीर करण्यात येईल.

'आरटीई' लॉटरी (RTE Lottery) जाहीर झाल्यानंतर पालकांना मोबाईल क्रमांकावर मेसेज येईल किंवा RTE पोर्टल वर जाऊन विद्यार्थी लॉगीन मध्ये जाऊन माहिती मिळेल, किंवा Application Wise Details / अर्जाची स्थिती या TAB वर जाऊन  तुम्ही अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. तुमच्या आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती येथे पहा

यंदा 'आरटीई' 25 टक्के प्रवेश वेळेत होणार

राज्यात यंदा नवीन शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी सुरु होणार असून, नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा 12 जून 2023 रोजी सुरु होणार आहे. 

शाळेच्या पहिल्या दिवशी RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी यंदा RTE ची प्रक्रिया जानेवारी पासूनच सुरु केली आहे. 

पहिल्या टप्प्यात शाळाची नोंदणी तर नंतर पालकांना ऑनलाईन अर्ज करण्यास मुभा देण्यात आली होती, आता RTE Lottery Result 2023 निकाल बुधवारी जाहीर होणार आहे.

'आरटीई' प्रवेशासाठी कागदपत्रांची होणार पडताळणी

RTE अंतर्गत बुधवारी जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत नंबर लागलेल्या बालकांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु होणार आहे. 

निकाल घोषित झाल्यानंतर पालकांना मोबाईल क्रमांकावर संदेश मिळणार आहे, त्याचबरोबर RTE च्या पोर्टल वर जाऊन लॉगीन मध्ये प्रवेशपत्र डाउनलोड करून जी कागदपत्रे फॉर्म भरताना दाखवली होती, ते कागदपत्रे घेऊन संबंधित कार्यालयात पडताळणीसाठी जावे लागणार आहे. त्यांनतर निवड झालेल्या शाळेत RTE अंतर्गत प्रवेश घेता येणार आहे.

RTE Official Website ला भेट देण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
 

हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              
Previous Post Next Post