'आरटीई' ची पहिली सोडत कधी निघणार येथे पहा RTE Maharashtra Lottery Result 2023

RTE Maharashtra Lottery Result 2023 : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेश अर्ज भरण्याची मुदत शनिवारी संपली आहे, राज्यातील RTE प्रवेश योजनेंतर्गत 8 हजार 828 शाळामधील 1 लाख 1 हजार 969 राखीव जागांसाठी 3 लाख 54 हजार 463 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्जाची संख्या ही जास्त आहे, त्यामुळे आता या राखीव जागांवर लवकरच पुढील RTE Lottery काढण्याची कार्यवाही सुरु होणार आहे. राज्यातील RTE साठी अर्ज केलेल्या पालकांचे RTE Maharashtra Lottery Result 2023 कडे लक्ष लागून आहे.

'आरटीई' ची पहिली सोडत कधी होणार जाहीर ?  RTE Maharashtra Lottery Result 2023

RTE Maharashtra Lottery Result
RTE Maharashtra Lottery Result

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 नुसार, शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) शाळांमध्ये आर्थिक दुर्बल व वंचित घटकांतील मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव असतात. प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळावा, या उद्देशाने या राखीव जागांवर विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत मोफत प्रवेश दिला जातो.

RTE 25 टक्के प्रवेशाची लॉटरी कशी काढली जाते ?

राज्यस्तरावरून एकच RTE Lottery Result जाहीर होणार आहे. सोडतीनंतर प्रत्यक्ष प्रवेशासाठी एक नियमित फेरी राबविली जाईल. या फेरीमध्ये संधी मिळू न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी टप्प्याटप्प्याने प्रतीक्षा यादीनुसार 4 फेऱ्या राबविल्या जातील.

RTE Lottery Result हा शाळेच्या प्रवेशक्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत / लॉटरी काढून प्रवेश निश्चित केले जातात, शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास प्राप्त झालेल्या अर्जापैकी सर्व पात्र अर्जदारांचा प्रवेशासाठी संधी दिली जाते.

लॉटरीद्वारे प्रवेश मिळाल्याचे अर्जदारास कसे कळेल?

RTE ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाबाबतची पुढील कार्यवाही Lottery पालकांना कशी कळणार ? 

आरटीई साठी अर्ज करताना पालकांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एस. एम. एस. (SMS) पाठविला जातो. त्यामुळे अर्जात दिलेला मोबाईल क्रमांक अर्जदारांनी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतसुरक्षित ठेवणे गरजेचे आहे, परंतु पालकांनी फक्त एस. एम. एस ( SMS )वर अवलंबून राहू नये. 

आर.टी.ई. पोर्टल वर Application wise details या tab वर क्लिक करून आपला अर्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पहावी. 

प्रवेशासाठी निवड झाल्यानंतर प्रवेश कसा घ्यावा ?

RTE प्रवेशासाठी निवड झाली आहे असा SMS प्राप्त झाल्यानंतर RTE पोर्टल वरील Application wise details या tab वर क्लिक करून आपला र्ज क्रमांक लिहून अर्जाची स्थिती पहावी लॉटरी लागली असेल तर प्रवेशपत्र प्रिंट काढावी आणि हमीपत्र या Tab वर क्लिक करून त्याचीसुद्धा प्रिंट काढावी. 

अॅलोटमैट लेटर वर आपल्या विभागात पडताळणी समितीचा पत्ता (address) दिलेला असेल त्या ठिकाणी अॅलोटमेंट लेटर हमी पत्राची प्रिंट आणि अॅलोटमेंट लेटर वर दिलेली आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित कार्यालयात जावे. 

कागदपत्रे पडताळणीस वेळेत उपस्थित न राहिल्यास काय होईल ?

आपला प्रवेश निश्चित झाल्याची प्रिंट पडताळणी सामितीकडून घ्यावी. SMS मध्ये दिलेल्या तारखेला पालक प्रवेशाकरिता आले नाहीत तर त्यांना पुन्हा दोन संधी ( SMSद्वारे ) देण्यात येतील तरीही निवड झालेल्या बालकाने विहित मुदतीत पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चित न केल्यास ती जागा रिक्त राहील आणि त्या जागेवर लॉटरी द्वारा निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यास अनुक्रमे संधी मिळेल. 

आर.टी.ई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रीये अंतर्गत प्रवेश मिळाला अथवा नाही हे कसे समजेल?

प्रवेशासाठी निवड झाली आहे असा SMS प्राप्त झाल्यानंतर पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे सबमिट केल्यावर त्यांना पडताळणी समितीकडून रसिट ( Receipt) पावती दिली जाईल. आणि प्रवेश मिळाला अथवा नाही ते समजेल. 

आर.टी.ई 25 टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश मिळाल्यावर स्थलांतर, बदली अथवा अन्य कारणाने आर. टी. ई मध्येच शाळा बदलून मिळेल का?

आर.टी.ई 25 टक्के अंतर्गत एका शाळेत प्रवेश मिळाल्यावर कोणत्याही कारणास्तव शाळा बदलून मिळत नाही.

आरटीई लॉटरी सोडत कधी निघणार आहे? 

यावर्षीच्या राखीव जागा व प्राप्त अर्ज लक्षात घेता एका जागेसाठी तीन ते चार विद्यार्थी स्पर्धेत असल्याने RTE प्रवेशासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. मार्च अखेर सोडत जाहीर होण्याची शक्यता असून, प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया एप्रिल व मे मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.

आरटीई ऑनलाईन अर्जाची स्थिती येथे तपासा

आरटीई प्रवेश लॉटरी निकालासाठी आवश्यक कागदपत्रे - RTE Maharashtra Lottery Result Documents

आरटीई प्रवेश महाराष्ट्र लॉटरी निकालासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे

  1. आधार कार्ड
  2. पासपोर्ट Size फोटो
  3. उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  4. दिव्यांग (अपंगत्व) प्रमाणपत्र
  5. जन्मदाखला (Birth Certificate)
  6. जात प्रमाणपत्र (Cast certificate)
  7. पत्त्याचा पुरावा (Address proof)
  8. आरटीई ऑनलाईन अर्जात नमूद केलेले संबंधित कागदपत्रे

संबंधित बातम्या

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                             

Previous Post Next Post