आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज 2023-24 कसा भरावा | RTE Online Application Form

राज्यातील 8 हजार 827 शाळांची नोंदणी RTE प्रवेश प्रक्रिया साठी पूर्ण झालेली आहे. त्यामध्ये 1 लाख 1 हजार 998 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. RTE प्रवेशासाठी लवकरच पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण या वेबसाईट ला भेट देत रहा.

{tocify} $title={ठळक मुद्दे}

आरटीई प्रवेश ऑनलाईन अर्ज 2023-24 कसा भरावा | RTE Online Application Form

ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खालील संपूर्ण माहिती वाचून घ्या त्यानंतर अर्ज करा जेणेकरून फॉर्म भरताना चुका होणार नाही.

RTE 25% योजनेअंतर्गत प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज 

 1. विद्यार्थी नोंदणी RTE New Registration
 2. ऑनलाईन अर्ज - RTE Online Application 
 3. विद्यार्थी माहिती भरणे - Child Information
 4. ऑनलाईन अर्ज भरणे - RTE Online Application 
 5. आरटीई शाळा निवड - School Selection
 6. भरलेल्या अर्जाची स्थिती Summary - Application Details
RTE 25 टक्के ऑनलाईन अर्ज कसा करावा?

स्टेप १ - विद्यार्थी नोंदणी RTE New Registration

आरटीई २५ % प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  RTE पोर्टल वर प्रथम विद्यार्थी नोंदणी (RTE New Registration) करावी लागते. नोंदणी करतानाची माहिती अचूक भरावी. कारण त्यामध्ये नंतर बदल करता येत नाही. त्यानंतर आपणास युजर आयडी व पासवर्ड आपल्या मोबाईल नंबरवर पाठविण्यात येतो. त्याचा वापर करून RTE पोर्टल मध्ये लॉगीन करून ऑनलाईन अर्ज भरावा लागतो. (RTE पोर्टल लिंक शेवटी दिली आहे.)
 • सर्वप्रथम student.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट वर जा
 • त्यानंतर Online Application यावर क्लिक करा
 • New Registration यावर क्लिक करा
 • नोंदणी करण्यासाठी एक छोटा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव , जन्मदिनांक अचूक नोंदवायचा आहे. कारण एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येत नाही. पुढे आपला जिल्हा निवडून तुमचा  मोबाईल नंबर व  Email ID टाकायचा आहे. 
 • त्यानंतर Register बटणावर क्लिक करा 
 • Register बटणावर क्लिक केल्यानंतर आपला User Name आणि Password  पेजवर दिसेल   
 • त्याचबरोबर आपल्या मोबाईल नंबरवर देखील आपला User Name आणि Password येईल

New Registration मध्ये बालकाचे नाव, जन्मतारीख, जिल्हा, फोन नंबर माहिती भरताना काही चुकल्यास Delete Application या बटनावर क्लिक करून अर्ज Delete करावा आणि नवीन अर्ज भरावा. (Delete Application हे ऑप्शन लॉगीन केल्यानंतर स्क्रीन वर दिसेल){alertInfo}  

 

स्टेप - २ ऑनलाईन अर्ज - RTE Online Application 

RTE पोर्टल वर विद्यार्थी नोंदणी (RTE New Registration) केल्यानंतर युजर आयडी व पासवर्ड चा वापर करून सर्वप्रथम एक नवीन पासवर्ड तयार करून घ्यावा कारण RTE प्रवेश प्रक्रिया संदर्भात आपल्याला शेवटपर्यंत युजर आयडी व पासवर्ड लागणार आहे. त्याचा वापर करून आपण आपल्या अर्जाची स्थिती आणि पुढील प्रवेश प्रक्रिया आपल्या लॉगीन मध्ये पाहू शकणार आहात.

 • आता आपल्याला RTE प्रवेश प्रक्रियेसाठी Login करायचे आहे.
 • लॉगीन करण्यासाठी या पेजवर आपला  User Name आणि Password व Captcha Code टाकून लॉगीन करा.

आता लॉगीन केल्यानंतर प्रथम आपल्याला आपला नविन पासवर्ड तयार करायचा आहे त्यासाठी आपल्या मोबाईल वर आलेला पासवर्ड टाकून दोन वेळा तुमचा नविन पासवर्ड टाका (नवीन पासवर्ड तयार करताना तो कमीत कमी ८ आणि जास्तीत जास्त १५ Characters मध्ये असावा आणि त्यामध्ये किमान १ Alphabet आणि १ Number असायला हवे.)

 • आता पुन्हा नवीन तयार केलेल्या पासवर्ड ने लॉगीन करा
 • लॉगीन केल्यानंतर आता संपूर्ण माहिती अचूक व काळजीपूर्वक भरावी. व प्रत्येक पेज वरील माहिती भरल्यानंतर Save बटनावर क्लिक करावे.

स्टेप - ३ विद्यार्थी माहिती भरणे - Child Information

RTE २५ % ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम लॉगीन करावे लागते. त्यांनतर विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती  Child Information भरावी लागते.

त्यामध्ये साधारणपणे बालकाचे संपूर्ण नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचे नाव , गावाचे नाव, तालुका, जिल्हा  पत्ता, ही संपूर्ण माहिती अचूक भरावी. त्याचबरोबर गुगल Map मधून पत्ता नोंद करावा लागतो.

ऑनलाईन अर्ज (RTE Application) या सेक्शन मध्ये प्रवेश घेण्याची इयत्ता, माध्यम, जात, धर्म, दिव्यांग असेल तर प्रकार, टक्केवारी आणि प्रमाणपत्र नंबर , कागदपत्र प्रुफ कोणते आहे? त्याची माहिती , मोबाईल नंबर पालकांचा इमेल आयडी, सध्याचा पत्ता इ माहिती अचूक भरावी लागते.

स्टेप - ४ आरटीई शाळा निवड - School Selection

ऑनलाईन अर्ज (RTE Application) या सेक्शन मधील माहिती भरल्यानंतर पुढील सेक्शन मध्ये आरटीई शाळा निवड (School Selection) करावी लागते. त्यामध्ये १ किमी, ३ किमी व त्यापेक्षा जास्त अंतर असणाऱ्या पात्र व अपात्र शाळांची नावे दिसतात त्यानुसार योग्य शाळांची निवड करायची असते. 

 • RTE 25 % प्रवेशासाठी शाळा निवड School Selection
 • या पेजवर आपल्याला RTE 25 %  शाळांची लिस्ट यादी दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर शाळेचा पत्ता व इतर माहिती दिसेल ते वाचून योग्य शाळा निवड करावी.

स्टेप - ५ भरलेल्या अर्जाची स्थिती Summary - Application Details

विद्यार्थी माहिती , ऑनलाईन अर्जातील माहिती व शाळेची निवड ही संपूर्ण माहिती आपल्याला या सेक्शन मध्ये दिसते. माहिती तपासून अचूक असल्याची खात्री करावी लागते. 

त्यानंतर अर्जात नमूद केलेली माहिती माझ्या ज्ञानाप्रमाणे सत्य आहे. माहिती चुकीची आढळून आल्यास अर्ज प्रवेशासाठी रद्द होईल आणि मी त्यास सर्वस्वी जबाबदार राहील याची परवानगी द्यावी. 

आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेशाचा अर्ज मी स्वतः भरला आहे, सदर अर्जात भरलेली सर्व माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळल्यास आणि बालकांची एकापेक्षा जास्त अर्ज भरलेला आढळल्यास आरटीई अंतर्गत मिळालेला प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते याची मला पूर्ण कल्पना आहे. हे प्रमाणपत्र वाचून खात्री करावी व चेक बॉक्स मध्ये क्लिक करावे. नंतर Confirm & Submit बटणावर क्लिक करावे.{alertWarning}

 • त्यांनतर आपल्या समोर एक पॉप अप ओपन होईल त्यावर ओके केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. 
 • ओके बटणावर क्लिक केल्यानंतर आता Genrate Pdf या बटणावर क्लिक करावे. व pdf ची प्रिंट काढून घ्यावी.
 • ही संपूर्ण माहिती भरताना त्या-त्यावेळी Save करावी लागते. याची काळजी घ्या. इथे अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होते. त्यानंतर आता आपणास लॉटरी पद्धतीने निवड यादीची प्रतीक्षा करावी लागेल.

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                             

Previous Post Next Post