Live - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांचे विशेष व्याख्यान

बाल साहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध बालसाहित्यिका व कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांचे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. संगीता बर्वे या आयुर्वेद शास्त्राच्या पदवीधर असून गेली अनेक वर्षे बाल साहित्याच्या क्षेत्रात काम करत आहेत. त्यांचे ‘मृगतृष्णा’, ‘दिवसाच्या वाटेवरुन’, ‘अंतरीच्या गर्भी’ हे कवितासंग्रह आणि ‘गंमत झाली भारी’, ‘उजेडाचा गाव’, ‘रानफुले’, ‘झाड आजोबा’, ‘खारूताई आणि सावलीबाई’, ‘मिनूचे मनोगत’, ‘भोपळ्याचे बी’, ‘नलदमयंती आणि इतर कथा’ आदी बालसाहित्य प्रकाशित आहे. त्यांना राज्य सरकारचा कवीवर्य भा. रा. तांबे आणि साने गुरुजी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग. ह. पाटील पुरस्कार, कवयित्री इंदिरा संत योजनेंतर्गत उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

मराठी भाषा गौरव दिन संपूर्ण माहिती येथे वाचा

मराठी भाषा गौरव दिन विशेष निमित्त कवियित्री डॉ संगीता बर्वे यांचे व्याख्यान

विषय - मराठी शिक्षणात बाल साहित्याची भूमिका 


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी 

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी 
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमच्या मनामनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक खेळ पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
कवी - सुरेश भट

'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायन / वादन या संदर्भात औचित्याचे पालन करणे आवश्यक ठरते. मार्गदर्शक सूचना

शासन निर्णय येथे डाउनलोड करा
Jai Jai Maharashtra Maza mp3 song Download

आणखी सरकारी योजना वाचा

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post