मोफत गणवेश योजना : शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार मुलांना मोफत गणवेश

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येणाऱ्या शैक्षणिक वर्ष जून 2023 पासून सुरू होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीसाठी प्रवेश घेण्यासाठी बालकाचे वय सहा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे, याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच जाहीर केला आहे. त्याचरोबर राज्य शासनाने मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी शाळांना उन्हाळी सुट्टी लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे शिलाई माप घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांना मिळणार शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश

मोफत गणवेश योजना

दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना अंतर्गत मुलांना मोफत गणवेश दिले जातात. दरवर्षी विद्यार्थ्यांचे शिलाई माप घेऊन ही संपूर्ण प्रक्रिया व्हायला खूप सारा वेळ यामध्ये निघून जातो. दरवर्षी 15 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळत असतात. मात्र यावर्षी शासनाने शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 15 जून 2023 रोजी विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत यासाठी आतापासूनच  तयारी सुरू केली आहे.

27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन संपूर्ण माहिती येथे वाचा

सन 2023 24 या शैक्षणिक वर्षांमध्ये मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता 2021-22 च्या यु-डायस संख्येनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमधील लाभार्थी संख्येच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांची शिलाई मापे घेण्यासाठी शाळांना उन्हाळी सुट्टी मिळण्यापूर्वी ही प्रक्रिया करण्यात यावी असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे आता 15 जून 2023 या शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळणार आहे.

मोफत गणवेश योजना कोणासाठी आहे?

केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मोफत गणवेश योजना राबवली जाते, या योजनेचा लाभ हा स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती मुले, अनुसूचित जमाती मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या बालकांना या मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जातो.

आणखी वाचा

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                           


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now