केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज वाढले, नवीन दर येथे पहा..

Sukanya Samriddhi Yojana Interest Rate 2023 : सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असलेल्या आणि SSY योजनेत गुंतवणूक करू इच्छिणारयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने 2023 24 या वर्षासाठी Sukanya Samriddhi Yojana Interest Rate 2023 24 जाहीर केला आहे. त्यामुळे तुम्ही मुलींसाठी असणाऱ्या या खास योजनेमध्ये मुलीचे SSY चे खाते सुरु करू शकता, याविषयीची सविस्तर माहिती पाहूया..

सुकन्या समृद्धी योजना काय आहे? | Sukanya Samriddhi Yojana

Sukanya Samriddhi Yojana Interest Rate

सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही केंद्र  सरकारने सुरु केलेली मुलींच्या कल्याणासाठी सुरु केलेली एक महत्वपूर्ण सरकारी योजना आहे.

सुकन्या समृद्धी योजनेत मुलींचे शिक्षण आणि लग्नासाठी  मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्याची व्यवस्था सुकन्या समृद्धी योजनेत मिळते.

सुकन्या समृद्धी योजना या योजनेलाच सुकन्या समृद्धी खाते (Sukanya Samriddhi Account) म्हणून देखील ओळखले जाते.  

सुकन्या समृद्धी योजनेचे 'हे' आहेत खास वैशिष्टे

बेटी पढाओ, बेटी बचाओ योजनेअंतर्गत केंद्र सरकारने Sukanya Samriddhi Yojana मध्ये सुरू केली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींचे भविष्य सुधारण्यासाठी SSY ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही दीर्घकालीन बचत योजना आहे. या योजनेत पालक आपल्या मुलींच्या नावावर गुंतवणूक करतात. ही सरकारी योजना असून, त्यात कोणताही धोका नाही. या योजनेत हमी परतावा उपलब्ध आहे.

  • SSY या योजनेत सरकार कडून जाहीर केल्या प्रमाणे व्याजदर मिळत राहतो. 
  • SSY सुकन्या समृद्धी खात्यातील एकुण जमा रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज दर मिळतो.
  • मुलीच्या कल्याणासाठी कमीत कमी रक्कम आपण भरून मुलीच्या भविष्यासाठी बचत करू शकतो. (कमीत कमी रू. २५० भरून आपण मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकतो.)
  • कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये SSY सुकन्या समृद्धी खाते उघडता येते.
  • SSY ही योजना २१ वर्षाची जरी असेल मात्र मुलीच्या वयाच्या १५ वर्षापर्यंतच पैसे भरावे लागतात.
  • मुलीच्या उच्च शिक्षणासाठी वयाच्या १८ व्या वर्षी जमा रकमेच्या ५०% रक्कम काढता येते.
  • सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुक रक्कमेवर आयकर सवलत (Income Tax) देखील उपलब्ध आहे.

सुकन्या समृद्धी योजना व्याजदर | Sukanya Samriddhi Yojana Interest Rate 2023 24

सरकारने एप्रिल ते जून 2023 या तिमाहीचे व्याजदर जाहीर केले आहे. आर्थिक वर्ष 2023 24 च्या पहिल्या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचे दर 0.40 % ने  वाढवले ​​आहेत.

सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात केंद्र सरकारने मोठी वाढ केली आहे, ही वाढ आता 8 टक्के इतकी करण्यात आली असून हा वाढीचा व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून लागू असणार आहे. यापूर्वीचा व्याजदर हा 7.6 टक्के इतका मिळत होता.

सुकन्या समृद्धी योजनेवर आता पर्यंत कमी जास्त होत गेलेले व्याजदर खालीलप्रमाणे

Sukanya Samriddhi Yojana Interest Rate
महत्वाच्या योजना

नवनविन अपडेट साठी  Whatsapp ग्रुप जॉईन करा.

                                                            
Previous Post Next Post