Pension Scheme News : राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या 'वारसांना' जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार, शासन निर्णय जारी

Pension Scheme Latest News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेतील सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास वारसांना कुटुंब निवृत्तीवेतन (Gratuity) आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लाभ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे, याबाबतचा शासन निर्णय दिनांक 21 जून 2023 रोजी निर्गमित केला आहे.

1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेतील 'हे' लाभ मिळणार

Pension Scheme Latest News

दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या   कर्मचाऱ्यांना  राज्य शासनाच्या सेवेतील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना (DCPS) राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्तीवेतन (Family Pension) आणि मृत्यु उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान, तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान दिनांक 31 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आले आहे.

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या 'वारसांना' जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार

दिनांक 31 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि इतर Gratuity उपदान लाभ देण्यात येत आहे. दिनांक 21 जून रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व अधिनस्त घटक महाविद्यालये/ प्रक्षेत्र / संस्था येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत सभासद असणाऱ्या कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच विद्यापीठसेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचान्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करण्यात आले आहे.

[या कर्मचाऱ्यांना दीडपट पगार देण्याचा शासन निर्णय येथे पहा]

उपदान रक्कम म्हणजे काय?

उपदान म्हणजे शासनाकडून कर्मचाऱ्यांना मिळालेली रक्कम आहे.  ही उपदान रक्कम कर्मचाऱ्यांच्या सेवा कालावधीवर अवलंबून असते.

उदाहरण - 

  • समजा 1 वर्षाच्या आत सेवा - असल्यास मिळणारे उपदान - अंतिम वेतनाच्या दुप्पट रक्कम मिळते.
  • 1 वर्ष ते 5 वर्ष सेवा - मिळणारे उपदान - अंतीम वेतनाच्या 6 पट रक्कम
  • 5 वर्ष ते 11 वर्ष सेवा- उपदान - अंतिम वेतनाच्या 12 पट रक्कम
  • 11 वर्ष ते 20 वर्ष दरम्यान सेवा, उपदान - अंतिम वेतनाच्या 20 पट रक्कम
  • 20 वर्ष पेक्षा जास्त सेवा, उपदान  - अंतिम वेतनाच्या 33 पट रक्कम
  • (कमाल मर्यादा 14 लाख रुपये) 

जुनी पेन्शन योजनेतील हे लाभ मिळणार

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व अधिनस्त घटक महाविद्यालये/ प्रक्षेत्र / संस्था येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुढील लाभ मंजूर करण्यात आले आहे.

  1. सेवेत असतांना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान,
  2. रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवा निवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.
  3. तसेच विद्यापीठ सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात येत आहे.

विकल्प नमुना फॉर्म

  • नमुना 1 - कुटुंबाचा तपशील
  • नमुना 2 - सेवेत असताना महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व अधिनस्त घटक महाविद्यालये/ प्रक्षेत्र/संस्था येथील कर्मचारी विकलांगतेमुळे विद्यापीठ सेवेकरिता असमर्थ ठरल्यास/मृत्यू पावल्यास त्याला अनुज्ञेय लाभ मिळण्याबाबतचा विकल्प नमुना 2 मध्ये भरणे आवश्यक आहे.
  • नमुना- 3 - परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दि.1 नोव्हेंबर 2005 ते 21जून 2023 पर्यंतच्या कालावधीत रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी / मृत्यु झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी द्यावयाचा विकल्प नमुना- 3 मध्ये भरणे आवश्यक आहे. (Old Pension Scheme News)
  • सर्व नमुने फॉर्म व शासन निर्णय येथे डाउनलोड करा
Previous Post Next Post