OLD Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, जुनी पेन्शन योजनेसंदर्भात महत्वाची बैठक, जाणून घ्या अपडेट

OLD Pension Scheme Latest News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी  जुनी पेन्शन योजना (OPS) संदर्भात एक महत्वाची अपडेट बातमी आहे, राज्य सरकारने राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी, निवृत्त जेष्ठ सनदी अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे, या समितीची जुनी पेन्शन योजने संदर्भात महत्वाची दुसरी बैठक मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. सविस्तर पाहूया..

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारने घेतला 'हा' निर्णय 

OLD Pension Scheme Latest News

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मार्च महिन्यामध्ये बेमुदत संप पुकारला होता. यानंतर राज्य सरकारने नवीन पेन्शन योजना व जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली. 

त्यानुसार सदर समितीस 1 नोव्हेंबर 2005  रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस / अहवाल शासनास सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

'जुनी पेन्शन योजना' त्रिसदस्यीय समितीची बैठक संपन्न

राज्यातील विविध सरकारी कर्मचारी संघटनांसोबत ही समिती चर्चा करत आहे, यासंदर्भात 21 एप्रिल 2023 रोजी मंत्रालय येथे एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये Old Pension Scheme आणि New Pension Scheme यांवर तुलनात्मक चर्चा झाली. सविस्तर येथे वाचा..

जुनी पेन्शन योजना 'या' राज्यांनी केली लागू

जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्यासाठी देशभरातील सरकारी कर्मचारी अग्रेसर भूमिका घेत आहेत, यापूर्वीच 'जुनी पेन्शन योजना' ही राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, पंजाब व हिमाचल प्रदेश या राज्यात NPS नंतर पुन्हा जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर वाचा..

सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'डीए' मध्ये भरघोस वाढ, राज्यांची यादी येथे पहा.

जुनी पेन्शन योजने संदर्भात महत्वाची बैठक

दिनांक 1 नोव्हेंबर 2005  रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरीता दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी समितीचे सदस्यासमवेत बैठक पार पडली

सदर बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार अधिकची माहिती द्यावयाची असल्याने आता पुन्हा संघटनेस बैठकीस बोलवण्यात आले आहे. ही बैठक दिनांक 9 मे 2023 रोजी साडे सहा वाजता मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 


Previous Post Next Post