Career Guidance Workshop : दहावी बारावीनंतर करीयरच्या विविध संधी, करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन..

Career Guidance Workshop : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी करीयरच्या विविध संधी (Career Opportunities) या विषयावर करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमासाठी कौशल्य विकास मा. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे, यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन - Career Guidance Workshop

Career Guidance Workshop

शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून, व्यवसायाच्या विविध संधीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर (Career Guidance Workshop) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत होणारे हे शिबीर शनिवार दिनांक 6 मे रोजी सकाळी 9 वाजता कुर्ला येथील डॉन बॉस्को इंडस्ट्रीयल ट्रेनिंग सेंटर येथे होणार आहे.

दहावी, बारावीनंतर विद्यार्थ्यांना 'करिअरच्या संधी' (Career Opportunities) या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. भविष्यात रोजगाराच्या संधी, व्यक्तिमत्त्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी, नवीन तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी याबाबत वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post