Software Engineering च्या क्षेत्रात आहेत करिअरच्या अनेक संधी, दरमहा कमवू शकता लाखो रुपये

Software Engineering Courses after 12th : करियर हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा, नुकत्याच 12th व 10th बोर्डाच्या परीक्षा संपल्या आहेत, दहावी व बारावी नंतर करीयर कोणत्या क्षेत्रात करावे? हा सर्वच पालक आणि विद्यार्थ्यांना पडलेला प्रश्न असतो. आजच्या लेखामध्ये आपण  Software Engineering क्षेत्रात कोणते Courses after 12th आहे?  यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनिरिंग करण्यासाठी आपल्यामध्ये कोणते कौशल्य असणे आवश्यक आहे? त्यासाठी शैक्षणिक पात्रता? सॉफ्टवेअर इंजीनीरिंगचे विविध पर्याय कोणते आहेत? आणि विशेष म्हणजे भविष्यात नोकरीच्या संधी आणि Software Engineering क्षेत्रात तुम्ही किती पैसे कमवू शकता? (Software Engineering Salary) याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.. 

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग क्षेत्रातील भविष्यातील संधी संपूर्ण माहिती | Software Engineering Information In Marathi

करियर निवडणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे. विशेषतः इयत्ता 10 वी आणि 12 वी नंतर आपण करियर निवडण्याचा मार्ग शोधत असतो. 

Software Engineering Courses after 12th


सॉफ्टवेअर इंजीनीरिंग क्षेत्रातील करियर निवड

आज असंख्य क्षेत्रात करियर करण्याच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. मात्र त्यातही आपले आवडीचे क्षेत्र आणि भविष्यातील संधी या गोष्टींचा विचार करून योग्य क्षेत्रात करियर निवडणे हे सर्वांसाठी खूपच आव्हानात्मक गोष्ट आहे. 

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग क्षेत्रात Career करण्यासाठी साहजिकच आपल्याला संगणकाची आवड असायला हवी, कॉम्प्युटरवर काम करण्याची आवड तुमच्यामध्ये आहे का? तुम्हाला कॉम्प्युटरची बेसिक माहिती आहे का? हे यासाठी की, जर आपल्याला एखाद्या क्षेत्रात आवड असेल तर आपण आपोआप त्यासंबंधी आपल्याला थोडीफार माहिती असते. आपण सॉफ्टवेअर इंजीनीरिंग क्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतोय म्हणजे आपल्याला संगणकाची आवड आहे. 

कोव्हीड १९ च्या काळात तर बहुतेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण  सुरु होते. आता देखील काही जण ऑनलाईन क्लास करत असतील , यादरम्यान आपण कॉम्प्युटर हाताळले का? किंवा आपल्या शाळेत संगणकावर काही काम आपण केले आहे का? काही बेसिक कॉम्प्युटर कोड लिहिता येतो का? 

कोडींग च्या संदर्भात आपल्याला काही बेसिक माहिती आहे का? कॉम्प्युटर सॉफ्टवेअर वापरण्याबाबत आपण उत्सुक आहात का? सॉफ्टवेअर कसे विकसित केले गेले आणि लिहिले गेले आहेत हे समजून घेण्याची आपल्यामध्ये इच्छा आहे का? तुम्हाला कॉम्प्युटरच्या भविष्यातील आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या (कृत्रिम बुद्धिमत्ता) संधीबद्दल आकर्षण वाटते का? 

अशा काही प्रश्नाद्वारे आपण सॉफ्टवेअर इंजीनीरिंग क्षेत्रातील आपला कल आहे किंवा नाही? विशेष म्हणजे सॉफ्टवेअर इंजीनीरिंग क्षेत्रात करियर करण्यासाठी आपली गणित विषयाची अभ्यासातील प्रगती कशी आहे?  याबाबतची सेल्फ टेस्ट करू शकतो. सॉफ्टवेअर इंजिनियर प्रोग्रामिंग तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकेल. आता आपण पाहूया सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय?

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे काय ? | What is software engineering?

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग म्हणजे थोडक्यात सांगायचे तर यामध्ये विविध सॉफ्टवेअर संगणकावर प्रोग्राम करण्यासाठी वेगवेगळ्या भाषेचा वापर केला जातो. 

उदा. Java, C Language, C++ Language इ. या प्रकारच्या कोणत्याही भाषेशिवाय कोणतेच सॉफ्टवेअर तयार करता येत नाही. यासाठी सॉफ्टवेअर इंजीनीरिंग मध्ये या भाषांचा वापर करून संबंधित सॉफ्टवेअर आणि संगणक प्रोग्राम तयार करण्याचा अभ्यासक्रम शिकविला जातो. यालाच सॉफ्टवेअर इंजीनीरिंग (Software Engineering) असे म्हणतात.

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग झाल्यानंतरचे कामकाज काय असते?

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग मध्ये देखील विविध प्रकार आहेत. ते आपण पुढे पाहणारच आहोत त्याआधी सॉफ्टवेअर इंजीनीरिंग झाल्यानंतर कॉम्प्युटरसाठी कोड डिझाईन करणे, कोडींग विकसित करणे, लिहिणे ज्यामुळे कॉम्प्युटरवर विविध कार्ये करणे शक्य होते.  त्याचबरोबर विंडोज 10,11, अँड्रॉइड, iOS, उबुंटू, लिनक्स इ. ऑपरेटिंग सॉफ्टवेअर विकसित करणे.

MS-ऑफिस, मोबाइल ॲप्स, अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर इ. सारखे अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर विकसित करतात. ते विविध बिझनेस क्लायंटसाठी काम करतात आणि त्यांच्या वापरासाठी बँकिंग सिस्टिम सॉफ्टवेअर (जे बँकेची बँकिंग सिस्टिम चालवते), प्रवाश्यांचे आरक्षण (रिझर्व्हेशन) सॉफ्टवेअर (रेल्वे बुकिंगसाठी, एअरलाइन बुकिंग इ.साठी वापरण्यात येणारे), इ. सारखे विशिष्ट सॉफ्टवेअर विकसित करणे. इ कामकाज सॉफ्टवेअर इंजिनियर ला करावे लागते.

सॉफ्टवेअर इंजीनीरिंगचे प्रकार | Types of software engineering

Software Engineering मध्ये आपण एका विशिष्ट विषयात/क्षेत्रात देखील Specialization करण्याची संधी मिळते. सॉफ्टवेअर इंजीनीरिंगचे प्रकार (Types of software engineering) खालीलप्रमाणे 

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग स्पेशलायझेशन |  Software Engineering Specialization

  1. सॉफ्टवेअर इंजिनिअर (सिस्टीम सॉफ्टवेअर) | Software Engineer (System Software)
  2. सॉफ्टवेअर इंजिनिअर (ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर) | Software Engineer (Application Software)
  3. सॉफ्टवेअर इंजिनिअर (वेब डेव्हलपमेंट) | Software Engineer (Web Development)
  4. सॉफ्टवेअर इंजिनिअर (मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट) Software Engineer (Mobile Application Development)
  5. सिस्टीम अ‍ॅनालिस्ट | System Analyst
  6. सिस्टीम आर्किटेक्ट | System Architect

1. सॉफ्टवेअर इंजिनिअर (सिस्टीम सॉफ्टवेअर) | Software Engineer (System Software)

Software Engineer मधील सिस्टीम सॉफ्टवेअर क्षेत्रात आपण Specialization करू शकता यामध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर सिस्टीम डिझाईन करण्याचा अभ्यासक्रम समाविष्ट असतो.  

यामध्ये कम्युनिकेशन, इन्व्हेंटरी (यादी) आणि नोंद ठेवणे इत्यादींसह अंतर्गत ऑपरेशन्स सुधारण्यास आणि सुलभ करण्यास मदत करतात. ते डिव्हाइस ड्राइव्हर्स्, फाईल सिस्टीम, इतर ऑपरेटिंग सिस्टीम कंम्पोनंट (घटक), कंपाइलर (संकलक), डीबगर (दोष निवारक) आणि इंट्रानेट जे ऑर्गनाझेशनमध्ये विविध विभागांना जोडतात यांना देखील डिझाईन करतात आणि मेंटेन करतात. या व्यतिरिक्त ते कंपनीचे कॉम्प्युटर सिक्युरिटी सिस्टीम डिझाईन करतात आणि टेक्निकल सपोर्ट देखील पुरवतात.

2. सॉफ्टवेअर इंजिनिअर (ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर) | Software Engineer (Application Software)

Application Software इंजिनिअर युटिलिटी प्रोग्राम आणि जनरल ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असे दोन्ही सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन डिझाईन करणे आणि विकसित करणे अशी कौशल्य यामध्ये विकसित केले जाते.

 Application Software इंजिनिअर सॉफ्टवेअर सिस्टीमच्या इन्स्टॉलेशनची (सिस्टीम बसवण्याचे काम) देखरेख करणे, कार्यरत असलेल्या इक्विपमेंटची (उपकरणांची) देखरेख करणे, समस्या सोडवण्यासाठी एक्सिस्टिंग (विद्यमान) सॉफ्टवेअर सुधारणे, कायर्क्षमता वाढवणे आणि नवीन हार्डवेअर प्लॅटफॉर्मवर त्याचा वापर सक्षम करणे, इतर गोष्टींबरोबरच ॲप्लिकेशन योग्यप्रकारे कार्य करतात की नाही याची खात्री करण्यासाठी सॉफ्टवेअर सिस्टीमची चाचणी करणे आणि व्हॅलिडेशन (प्रमाणीकरण) करणे इ.कामांचा समावेश होतो. 

काही अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअर इंजिनिअर व्यवसायिकरित्या विकले गेलेले सॉफ्टवेअर सुट डिझाईन करतात आणि विकसित करतात, तर बरेचजण बिझनेस किंवा इतर ऑर्गनायझेशनसाठी अ‍ॅप्लिकेशन डिझाईन किंवा कस्टमाईझ्ड (च्यासाठी विशेष तयार करणारे) करतात.

3. सॉफ्टवेअर इंजिनिअर (वेब डेव्हलपमेंट) | Software Engineer (Web Development)

Software Engineer (वेब डेव्हलपमेंट) वेब डेव्हलपमेंटच्या विस्तृत क्षेत्रात काम करतात. ज्यामध्ये वेब डिझाईन, वेब कन्टेंट डेव्हलपमेंट, वेबसाइटची कार्यक्षमता विकसित करणे, क्लायंट-साइड / सर्व्हर-साइड स्क्रिप्टिंग करणे (कोड लिहिणे), नेटवर्क सिक्युरिटी कॉन्फिगरेशन (संरचना) करणे यासह वेबसाइट विकसित करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचा समावेश असतो.

4. सॉफ्टवेअर इंजिनिअर (मोबाइल अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट) Software Engineer (Mobile Application Development)

Mobile Application Development नावानुसार, मोबाइल अ‍ॅप डेव्हलपर मोबाइल फोनमध्ये वापरल्या जाणार्‍या Software टेक्नॉलॉजीमध्ये तज्ज्ञ असतात. ते गूगलच्या अँड्रॉइड, अ‍ॅपलच्या iOS आणि मायक्रोसॉफ्टच्या विंडोज फोन प्लॅटफॉर्मसाठी अ‍ॅप्लिकेशन तयार करतात. 

सामान्यतः मोबाइल अ‍ॅप डेव्हलपर प्रथम त्यांना ज्यासाठी अ‍ॅप्लिकेशन विकसित करायचे आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम निवडतात आणि नंतर त्या प्लॅटफॉर्म साठी प्रोग्रामिंग लँग्वेजेस आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट (प्रोग्रामिंग साठी आवश्यक सुविधा) शिकतात.

5. सिस्टीम अ‍ॅनालिस्ट | System Analyst

सिस्टीम अ‍ॅनालिस्ट इन्फॉर्मेशन सिस्टीमचे डिझाईन करणे, विश्लेषण करणे आणि इम्प्लिमेंट करणे (अंमलात आणणे) यामध्ये तज्ञ असणारे IT प्रोफेशनल असतात. ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून बिझनेस समस्या सोडवण्यासाठी विश्लेषण आणि डिझाईन टेक्निक एकत्रितपणे वापरतात. 

तसेच, त्यांना आवश्यक असणारी उद्दष्टे मिळावीत म्हणून इन्फॉर्मेशन सिस्टीमची योग्यता निश्चित करणे आणि एन्ड युझर (वापरकर्ते), सॉफ्टवेअर व्हेंडर्स (विक्रेते) आणि प्रोग्रामर यांच्याशी संवाद साधणे ही त्यांची जबाबदारी असते.

6. सिस्टीम आर्किटेक्ट | System Architect

सिस्टीम आर्किटेक्ट (System Architect)  हे ऑर्गनायझेशन / कंपनीसाठी कॉम्प्युटर सिस्टीम आणि नेटवर्क विकसित करणारे आणि इम्प्लिमेंट करणारे (अंमलात आणारे) टेक्नॉलॉजी प्रोफेशनल असतात. ते सिस्टीमला कंम्पोनंटमध्ये (घटक) विभागून, कंम्पोनंट इंटरॅक्शन (संवाद) आणि इंटरफेस (दुवा) ठेवून करून सिस्टीमचे आर्किटेक्चर ठरवतात आणि / किंवा डिझाईनमध्ये वापरल्या जाणार्‍या टेक्नॉलॉजी आणि रिसोर्सेस ठरवतात. सिस्टम आर्किटेक्ट नेटवर्किंग आणि कॉम्प्युटर सिस्टीम विकसित करतात, कॉन्फिगर (संरचना) करतात, ऑपरेट करतात आणि मेंटेन करतात.

सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्यासाठी काय करावे? | What to do to become a software engineer?  

 सॉफ्टवेअर इंजीनीरिंग प्रवेशाचा मार्ग | Here's your entry pathway 

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी विविध मार्ग आहेत. त्याची माहिती खालीलप्रमाणे

1) इयत्ता 10वी (माध्यमिक शालान्त परीक्षा) पूर्ण झाल्यानंतर, इयत्ता 11वी-12वी (उच्च माध्यमिक) फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स (भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र आणि गणित) या मुख्य विषयांसह सायन्स(विज्ञान) शाखेतून पास व्हावे. त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर डिग्री घेऊन ग्रॅज्युएशन (पदवी) पूर्ण करावे किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये B.Tech किंवा इतर तत्सम कोर्ससाठी प्रवेश घ्यावा.

2) इयत्ता 10वी (माध्यमिक शालान्त परीक्षा) पूर्ण झाल्यानंतर, इयत्ता 11वी-12वी (उच्च माध्यमिक) मॅथेमॅटिक्स (गणित) या विषयांसह कोणत्याही शाखेतून पास व्हावे. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / कॉम्प्युटर सायन्स किंवा मॅथेमॅटिक्स सह किंवा मॅथेमॅटिक्स शिवाय कोणत्याही तत्सम विषयामध्ये मध्ये बॅचलर्स डिग्री (पदवी) पूर्ण करावी.

3) मॅथेमॅटिक्स (गणित) आणि कोणत्याही विषयांसह इयत्ता 10वी (माध्यमिक शालान्त परीक्षा) पूर्ण झाल्यानंतर, इयत्ता 11वी-12वी (उच्च माध्यमिक) कोणत्याही शाखेतून पास व्हावे. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन / कॉम्प्युटर सायन्स किंवा कोणत्याही तत्सम विषयामध्ये बॅचलर्स डिग्री (पदवी) पूर्ण करावी.

4) मॅथेमॅटिक्स (गणित) आणि कोणत्याही विषयांसह इयत्ता 10वी (माध्यमिक शालान्त परीक्षा) पूर्ण झाल्यानंतर, इयत्ता 11वी-12वी (उच्च माध्यमिक) कोणत्याही शाखेतून पास व्हावे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स / IT / सॉफ्टवेअर याव्यतिरिक्त कोणत्याही इंजिनिअरिंग शाखेतून बॅचलर्स डिग्री (पदवी) पूर्ण करू करावी. त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेजेस / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / मशीन लर्निंग / कोडींग / डेटा सायन्स किंवा संबंधित विषयामध्ये शॉर्ट टर्म (अल्प अवधीचा) कोर्स साठी प्रवेश घेऊ शकता.

5) मॅथेमॅटिक्स (गणित) आणि कोणत्याही विषयांसह इयत्ता 10वी (माध्यमिक शालान्त परीक्षा) पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही मॅथेमॅटिक्स विषयासह किंवा मॅथेमॅटिक्स आणि कॉम्प्युटर या विषयांसह किंवा कॉम्प्युटर विषयासह कॉमर्स शाखेतून इयत्ता 11वी-12वी (उच्च माध्यमिक) पास व्हावे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा संबंधित विषयामध्ये बॅचलर्स डिग्री (पदवी)/असोसिएट लेव्हल(तत्सम पातळीचा) प्रोग्राम पूर्ण करावा.

6) सायन्स, मॅथेमॅटिक्स (गणित) आणि कोणत्याही विषयांसह इयत्ता 10वी (माध्यमिक शालान्त परीक्षा) पूर्ण झाल्यानंतर, ‘फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि बायोलॉजी’ (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र) किंवा ‘फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स’ किंवा ‘फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स, कॉम्प्युटर’ किंवा ‘फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, कॉम्प्युटर’ या विषयांसह सायन्स(विज्ञान) शाखेतून इयत्ता 11वी-12वी (उच्च माध्यमिक) पास व्हावे. त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या विषयामध्ये बॅचलर्स डिग्री (पदवी)/असोसिएट लेव्हल (तत्सम पातळीचा) प्रोग्राम पूर्ण करावा.

7) कोणत्याही विषयांसह इयत्ता 10वी (माध्यमिक शालान्त परीक्षा) पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) या विषयांसह सायन्स(विज्ञान) शाखेतून इयत्ता 11वी-12वी (उच्च माध्यमिक) पास व्हावे. त्यानंतर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर (पदवी) ऑफ इंजिनिअरिंग / B.Tech किंवा तत्सम कोर्स पूर्ण करावा. त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा तत्सम मध्ये मास्टर (पदव्युत्तर पदवी) ऑफ इंजिनिअरिंग / M.Tech पूर्ण करता येते.

8) इयत्ता 10वी (माध्यमिक शालान्त परीक्षा) पूर्ण झाल्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) या मुख्य विषयांसह सायन्स(विज्ञान) शाखेतून इयत्ता 11वी-12वी (उच्च माध्यमिक) पास व्हावे. त्यानंतर इंजिनिअरिंग मध्ये बॅचलर डिग्री किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये B.Tech किंवा इतर कोणताही तत्सम कोर्स पूर्ण करून ग्रॅज्युएशन (पदवी) पूर्ण करावे. पुढील शिक्षणाकरिता M.E (मास्टर(पदव्युत्तर पदवी) ऑफ इंजिनिअरिंग) कोर्स किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये M.Tech साठी प्रवेश घ्यावा.

9) इयत्ता 10वी (माध्यमिक शालान्त परीक्षा) पूर्ण झाल्यानंतर मॅथेमॅटिक्स (गणित) या विषयासह कोणत्याही शाखेतून इयत्ता 11वी-12वी (उच्च माध्यमिक) पास व्हावे. त्यानंतर इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, IT, STEM च्या कोणत्याही विषयामध्ये किंवा तत्सम मध्ये बॅचलर डिग्री(पदवी) पूर्ण करून तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण करावे. पुढील शिक्षणाकरिता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये MBA करता येते.

10) इयत्ता 10वी पूर्ण (माध्यमिक शालान्त परीक्षा) झाल्यानंतर मॅथेमॅटिक्स (गणित) या विषयासह कोणत्याही शाखेतून इयत्ता 11वी-12वी (उच्च माध्यमिक) पास व्हावे. त्यानंतर मॅथेमॅटिक्स या विषयासह कोणत्याही शाखेतून बॅचलर डिग्री(पदवी) पूर्ण करावी. त्यानंतर कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा IT किंवा तत्सम मध्ये मास्टर्स(पदव्युत्तर पदवी) प्रोग्राम (MCA किंवा M. Sc.सारखे) पूर्ण करता येतो.

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग प्रवेशासाठी शैक्षणिक अहर्ता | Educational Qualification for Software Engineering Admission

सॉफ्टवेअर इंजीनीरिंगसाठी किमान शैक्षणिक अहर्ता  | MINIMUM EDUCATION REQUIRED

Under Graduate

(Undergraduate Degree / Honours Diploma / Graduate Diploma (equivalent to a Degree) Programs for which the minimum eligibility is a pass in Higher Secondary / Class XII School Leaving examination.

सॉफ्टवेअर इंजीनीरिंगसाठी कमाल शैक्षणिक अहर्ता | MAXIMUM EDUCATION REQUIRED

Post Graduate

Postgraduate Degree / Diploma / Certificate Programs for which the minimum eligibility is a pass in Graduation / equivalent Diploma program like Honours Diploma or Graduate Diploma.


सॉफ्टवेअर इंजीनीरिंग मध्ये भविष्यातील नोकरीच्या संधी | Software Engineering Job Opportunities

तुमच्याकडे B.E./BCA/B.Tech/B.Sc. मॅथ्स/M.Sc. IT/MCA सारखी डिग्रीअसल्यास तुम्ही प्रोग्रामर ॲनालिस्ट ट्रेनी किंवा ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअरसारख्या एंट्री लेव्हल पदापासून तुमच्या करिअरची सुरुवात करू शकता. 

जर तुम्ही IIT मधून ग्रॅज्युएट झालेले असाल किंवा तुम्ही भारतातील कोणत्याही प्रतिष्ठित संस्थेतून M.E./M.Tech केले असेल तर तुम्ही नामांकित IT कंपन्यांमध्ये असोसिएट ॲनालिस्ट म्हणून सुरुवात करू शकता.

सॉफ्टवेअर इंजिनिअरला सार्वजनिक आणि खासगी दोन्ही क्षेत्रात नोकरीच्या बर्‍यापैकी संधी मिळू शकतात. गूगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, IBM, TCS, इन्फोसिस, कॉग्निझंट, कॅपजेमिनी, इ. सारख्या IT कंपन्यांमार्फत त्यांची भरती केली जाते. सॉफ्टवेअर इंजिनिअर्स / सॉफ्टवेअर डेव्हलपर यांना सरकारी संस्था, बिझनेस (मोठे आणि लहान दोन्ही), फायनान्स व इन्श्युरन्स कंपन्या (वित्तीय आणि विमा कंपन्या), मेडिकल (वैद्यकीय) इन्स्टिट्यूशन, नेटवर्किंग / वेब डिझायनिंग फर्म, IT कंपन्या आणि राष्ट्रीय संरक्षण शाखा यामध्ये देखील काम मिळू शकते.

सभोवतालची परिस्थिती

सॉफ्टवेअर इंजिनिअर सहसा आरामदायक आणि चांगल्या वातानुकूलित(AC) वातावरणात काम करतात. त्यांना त्यांच्या कामाच्या वेळेचा एक महत्त्वाचा भाग कॉम्प्युटर / लॅपटॉपसमोर घालवावा लागतो. क्लायंट मिटिंग त्यांच्या कामाचा जवळजवळ नियमित भाग असतो. बहुतेक सॉफ्टवेअर इंजिनिअर दररोज सुमारे 9-10 तास काम करतात, परंतु कधीकधी त्यांना प्रोजेक्टच्या डेडलाईनची (अंतिम मुदत) पूर्तता करण्यासाठी किंवा अनपेक्षित टेक्निकल समस्यांचे निराकरण करण्यासाठी आठवड्याच्या शेवटी आणि अतिरिक्त वेळ देखील काम करावे लागते.

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग भविष्यातील संधी

करिअरच्या सुरूवातीस, प्रोग्रामर ॲनालिस्ट ट्रेनी, ट्रेनी सॉफ्टवेअर इंजिनिअर, असिस्टंट सिस्टिम्स इंजिनिअर, ज्युनिअर वेब डेव्हलपर, असोसिएट सॉफ्टवेअर इंजिनिअर इत्यादी सारखे एंट्री लेव्हलची कामे करू शकता.

सुमारे 7-10 वर्षांचा अनुभव घेतल्यानंतर, तुम्ही सिनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर, लीड सॉफ्टवेअर इंजिनिअर, सिनिअर टेक्निकल आर्किटेक्ट इत्यादी पदावर प्रगती करू शकता.

सुमारे 12-15 वर्षांच्या कालावधीत, तुम्ही सिनिअर लेव्हल मॅनेजमेंट /ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रोलमध्ये डेव्हलपमेंट टीम लीड, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट मॅनेजर, डायरेक्टर (संचालक), व्हॉइस प्रेसिडन्ट (उपाध्यक्ष), चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर (CTO-मुख्य तंत्रज्ञान अधिकारी) यासारख्या पदावर प्रगती करू शकता.

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग क्षेत्रामध्ये आपण किती पैसे कमवू शकता? 

एंट्री लेव्हलच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या कामामध्ये तुम्ही दरमहा सुमारे रु. 18,000 - 45,000 कमवू शकता. 2-3 वर्षांच्या अनुभवानंतर तुम्ही दरमहा सुमारे रु. 20,000 - 60,000 किंवा अधिक कमवू शकता.

6-10 वर्षांच्या अनुभवानंतर या क्षेत्रातील मिड -लेव्हल कामामध्ये तुम्ही तुमच्या कामाच्या स्वरुपानुसार व पदानुसार दरमहा सुमारे रु. 30,000 - 1,50,000 किंवा अधिक कमवू शकता.

software engineering salary



सिनिअर लेव्हल पदावर (12-20 वर्षांच्या अनुभवासह) तुम्ही दरमहा सुमारे रु. 50,000 - 5,00,000  किंवा अधिक कमवू शकता.

सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पगार त्यांच्या कंपनीवर देखील अवलंबून असतो. उदाहरणार्थ, गूगल मधील सॉफ्टवेअर इंजिनिअरचे मिड लेव्हलला वार्षिक पॅकेज रु. 4,50,000 - 38,00,000 दरम्यान असते, मायक्रोसॉफ्ट मध्ये मिड लेव्हलला वार्षिक पॅकेज सामान्यतः रु.3,60,000 - 26,00,000 दरम्यान असते, आणि इंटेल मध्ये सरासरी पॅकेज रु.6,90,000 - 29,00,000 असते.

सारांश 

सॉफ्टवेअर इंजीनीरिंग क्षेत्रातील करियरचे विविध पर्याय जसे की, सॉफ्टवेअर इंजिनिअर  System Software, Application Software, Web Development, Mobile Application Development, System Analyst, System Architect सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग क्षेत्रातील कामाचे स्वरूप , शैक्षणिक अहर्ता, भविष्यातील संधी , आपण किती पैसे कमवू शकाल याबद्दलची संपूर्ण माहिती (Software Engineering Information In Marathi) आज आपण बघितली तेव्हा आपल्याला जर या क्षेत्रात करियर करायचे असल्यास अवश्य याबद्दलची माहिती साठी हे आर्टिकल अवश्य वाचावे. करियर निवडताना आपण गोंधळून जात असाल, हे करू का ते करू कोणते क्षेत्र निवडू जेणेकरून भविष्य उज्वल होऊ शकेल यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या मधील आवड आणि क्षमता ओळखण्यासाठी यापूर्वीचे आर्टिकल अवश्य वाचावे. त्याची लिंक खाली दिली आहे.

स्वत:मधील क्षमतांचा शोध कसा घ्यावा?

महा करियर पोर्टल चा वापर कसा करावा? (How to use Maha Career Portal?) यासंदर्भात याआधीच्या लेखात चर्चा केली आहे. तेव्हा आपण आवर्जून हा लेख संपूर्ण वाचन करून अवश्य  महा करियर पोर्टलचा वापर करावा.
महा करियर पोर्टल मध्ये आपणास विविध कोर्स, शैक्षणिक पात्रता ,कॉलेज महाविद्यालयाची माहिती , शिष्यवृत्ती माहिती , भविष्यातील संधी , तुम्ही किती पैसे कमवू शकता. कोर्सेस साठी प्रवेश परीक्षा विषयी , आवश्यक क्षमता , नोकरीच्या संधी अशा विविधांगी परिपूर्ण माहिती आपणास महाकरियर पोर्टल वर अगदी मोफत मिळेल.


हे सुद्धा वाचा



महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             


Previous Post Next Post