Career Options After 12th : बारावी नंतर भारतीय सागरी विद्यापीठात करियरचे विविध पर्याय उपलब्ध, ऑनलाईन अर्ज सुरू..

Indian Maritime University Course Admissions 2023 : दहावी बारावी नंतर करियर हा एक महत्वाचा टप्पा आहे, आज करियरचे विविध पर्याय उपलब्ध झाले आहे, एका वेगळ्या प्रकारच्या क्षेत्रात करियर करण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी आहे,  भारतीय सागरी विद्यापीठात करियरचे विविध पर्याय उपलब्ध असून, 2023 24 च्या प्रवेश प्रक्रियेकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत, तसेच अध्यापकांच्या रिक्त जागांसाठी देखील अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे, याविषयीची सविस्तर माहिती पाहूया..

भारतीय सागरी विद्यापीठात करियरचे विविध पर्याय उपलब्ध – कुलगुरु मालिनी शंकर


Career Options After 12th

समुद्र व त्याच्याशी निगडीत जहाज बांधणी, प्रशिक्षण, व्यवस्थापन असे विविध कोर्सेस उपलब्ध करुन देणाऱ्या चैन्नई स्थित भारतीय सागरी विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी अर्ज मागविण्यात येत असून 14 मे ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. 

सागरी विद्यापीठाद्वारे चालविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांला विदर्भातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन करियरसाठी नवा पर्याय निवडण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

विद्यापीठाचे कोची, मुंबई, नवी मुंबई, कोलकत्ता, चेन्न्ई, विशाखापट्टनम येथे कॅम्पस असून येथे 3 हजार विद्यार्थ्यांची क्षमता आहे. एकूण 17 खाजगी महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत व त्यांची क्षमताही 3 हजार विद्यार्थ्यांची असल्याचे श्रीमती शंकर यांनी सांगितले.

दहावी, बारावी नंतर करिअर 'कसे निवडावे' नव्हेतर 'कसे घडवावे' यासाठी पहा 5 महत्त्वाच्या टिप्स

नवीन शैक्षणिक सत्रासाठी 14 मे पर्यंत अर्ज करता येणार ; सत्राला 10 जूनपासून सुरुवात

विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रासाठी 14 एप्रिल पासून अर्ज मागविण्यात आले आहेत. 14 मे पर्यंत अर्ज करता येणार असून, 10 जूनपासून नवीन सत्रास प्रारंभ  होणार आहे. तांत्रिक व अतांत्रिक पध्दतीचे अभ्यासक्रम या विद्यापीठाद्वारे चालविण्यात येतात. 

पात्रता

  1. तांत्रिक अभ्यासक्रमांत B.Tech आणि M.Tech हा अभ्यासक्रम चालविण्यात येतो. यासाठी इयत्ता 12 वी मध्ये (PCM Group) किमान 60 टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास पात्र राहतील. 
  2. बी.बी.ए. (BBA) अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्याशाखेतून किमान 50 टक्के गुणांनी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरतील. 
  3. एम.बी.ए. (MBA) अभ्यासक्रमासाठी कोणत्याही विद्याशाखेतून किमान ५५ टक्के गुणांनी पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी पात्र ठरतील. 

विविध अभ्यासक्रमांसाठी मागविण्यात आलेल्या अर्जांबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.imu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अध्यापक पदांच्या 26 जागांसाठी 4 मे पर्यंत अर्ज करता येणार

विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक सत्रातील प्रवेश आणि अध्यापकांच्या भरावयाच्या पदांबाबत श्रीमती शंकर यांनी माध्यमांना आज माहिती दिली.  अध्यापकांच्या  26 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

विद्यापीठाने सहयोगी प्राध्यापक पदांच्या 14 जागांसाठी तर सहाय्यक प्राध्यापक (Associate Professor) पदांच्या 12 जागांसाठी अर्ज मागविले आहेत. 

समुद्र अभियांत्रिकीच्या 7 आणि नॉटीकल सायन्सच्या 7 अशा एकूण 14 सहयोगी  प्राध्यापकांच्या जागा आहेत. 

यातील 7 जागा आरक्षित तर उर्वरित 7 जागा अनारक्षित आहेत. समुद्र अभियांत्रिकीच्या  6 आणि नॉटीकल सायन्सच्या 6 अशा एकूण 12 सहायक प्राध्यापकांच्या (assistant professor) जागा आहेत. 

यातील ७ जागा आरक्षित तर उर्वरित 5 जागा अनारक्षित आहेत. या पदांसाठी 4 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज स्विकारले जातील. नवी मुंबई, चेन्नई, विशाखापट्टनम आणि कोची येथे कॅम्पस डायरेक्टरच्या प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 4 जागांसाठी अर्जही मागविण्यात आले असून 2 मे पर्यंत अर्ज करता येणार आहे.

अध्यापक पदांच्या जागांबाबत सविस्तर माहिती विद्यापीठाच्या www.imu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विदर्भातील विद्यार्थी व पात्र उमेदवारांनी लाभ या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन

विविध अभ्यासक्रमांसाठी मागविण्यात आलेल्या अर्जांबाबत आणि अध्यापक पदांच्या जागांबाबत या दोन्ही संधीचा विदर्भातील विद्यार्थी व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि करियरच्या दृष्टीने महत्वाच्या व वेगळ्या क्षेत्राकडे वळावे, असे आवाहन भारतीय सागरी विद्यापीठाच्या कुलगुरु मालिनी शंकर यांनी केले आहे.

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

           

Previous Post Next Post