राज्यातील शिक्षकांच्या यापुढे बदल्या होणार नाहीत; अखेर शालेय शिक्षण विभागाने काढले आदेश..

Government Employees News : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक भरती लवकरच करण्यात येणार असून, नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना आता यापुढे जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही म्हणजेच यापुढे शिक्षकांच्या बदल्या होणार नाही, याबाबत शिक्षक भरती, रिक्त जागा निश्चित करणे आणि नवीन शिक्षकांची नियुक्तीच्या बदली बाबत सुधारित अटी लागू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. सविस्तर पाहूया..

राज्यात 30 हजार जागांसाठी शिक्षकांची भरती

Government Employees Teacher News

राज्यातील शिक्षक भरती आता अंतिम टप्प्यात असून, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) परीक्षेच्या आधारे रिक्त जागांवर उमेदवारांना नियुक्ती मिळणार आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वित्त विभागाच्या दिनांक 31 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या रिक्त पदांपैकी 50 टक्के पदे भरण्याबाबत मान्यता दिलेली आहे.

राज्यांमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील जवळपास 65 हजार 111 पदे ही रिक्त असून सद्यस्थितीत 30 हजार शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहे.

{getButton} $text={Join WhatsApp Group} $icon={whatsapp}

यापुढे शिक्षकांच्या बदल्या होणार नाहीत

बऱ्याच जिल्ह्यामध्ये शिक्षक नियुक्तीनंतर आपल्या सोयीच्या जिल्ह्यामध्ये बदली करण्यासाठी प्रयत्नशील असतात. या प्रकारच्या बदल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये शिक्षक मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त ठरत आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त राहत आहेत, अशा प्रकारच्या विषमतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

त्याचबरोबर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार कोणत्याही शाळेतील 10 टक्के पेक्षा अधिक पदे रिक्त राहू न देण्याच्या तरतुदीचे देखील पालन करणे अशक्य होत असल्याची परिस्थिती उद्भवत आहे.

यामुळे आता नवीन सुधारित अटी व शर्ती नुसार नवीन नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना जिल्हा बदलीचा हक्क राहणार नाही. असे दिनांक 21 जून 2023 च्या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. [सुधारित अटी व शर्ती शासन निर्णय पहा]

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेतील लाभ शासन निर्णय पहा
Previous Post Next Post