One State One Uniform Scheme : शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य एक गणवेश' योजना लागू होणार, असा असेल 'एक राज्य एक गणवेश', शासन निर्णय जारी..

One State One Uniform Scheme : राज्यातील विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड विषयास अनुरूप एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश उपलब्ध करुन देण्याकरीता योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिनांक 8 जून 2023 रोजी शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णय जारी केला आहे, आता राज्यातील विद्यार्थ्यांना एक राज्य एक गणवेश या योजने अंतर्गत एकसमान गणवेश मिळणार आहे, त्याचबरोबर शासनामार्फत विद्यार्थ्यांना बूट आणि सॉक्स देखील मोफत दिले जाणार आहे.

'एक राज्य एक गणवेश' योजना लागू होणार

One State One Uniform Scheme
One State One Uniform Scheme

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने राज्यातील शासकीय शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत घोषणा केली होती. त्याअनुषंगाने (New Academic Year) नव्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजना राबवली जाणार आहे. यामध्ये राज्यातील शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांनाएक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश असणार आहे व सोबतच विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स देखील देण्याबाबतची माहिती नुकतीच शालेय शिक्षण मंत्री यांनी मीडियाशी बोलताना दिली होती. आता याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना आदेश काढण्यात आले आहेत.

समग्र शिक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामधील इ.1 ली ते इ.8 वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच, सन 2023 24 या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील देण्यात येणार आहे. 

सदर योजनेंतर्गत एका गणवेशाकरीता रु.300/- याप्रमाणे प्रति विद्यार्थी दोन गणवेशाचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेचा निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस शासनामार्फत उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्तरावर गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जातात.

स्काऊट व गाईड विषयाच्या शिक्षणासाठी वेगळा गणवेश निश्चित

स्काऊट व गाईड शिक्षणाची संस्कार क्षमता विचारात घेवून राज्यातील शाळांमध्ये स्काऊट शिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे. सदर स्काऊट व गाईड विषयाच्या शिक्षणासाठी वेगळा गणवेश निर्धारित करण्यात आलेला आहे. 

त्यामुळे मोफत गणवेश योजनेंतर्गत संपूर्ण राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड विषयास अनुरूप एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश उपलब्ध करुन देण्याकरीता योजनेच्या अंमलबजावणीसाठी दिनांक 8 जून 2023 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा
'रजा' संदर्भात महत्वाचा शासन निर्णय येथे पहा
पेन्शन संदर्भात लेटेस्ट न्यूज पहा

असा असेल 'एक राज्य एक गणवेश' 

  • विद्यार्थ्यांना उर्वरित एक गणवेश स्काऊट व गाईड विषयास अनुरूप (मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पैंट पैंट तर 
  • मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात येणार आहे.
  • विद्याथ्यांच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप (Shoulder Stripe) व दोन खिसे (Double Pocket असणार आहे. स्काऊट व गाईड विषयासाठी आवश्यक असणाऱ्या गणवेशामधील टोपी व स्कार्फ याबाबत वेगळ्याने आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.

आठवड्यात तीन दिवस गणवेश परिधान करावा लागणार

स्काऊट व गाईड या विषयाच्या तासिका आठवडयातून दोन दिवस असतात. त्यापैकी एक तासिका शक्यतो शनिवारी असते. त्यामुळे मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी स्काऊट व गाईड विषयास अनुरूप उपलब्ध करुन देण्यात येणारा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक राहील. तसेच उर्वरित सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश परिधान करण्यात यावा.

पुढील शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या वतीने गणवेश मिळणार 

पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच सन २०२४-२५ पासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एक समान एक रंगाचे दोन गणवेश उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये मोफत गणवेश योजनेबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करू नये. याबाबतच्या आवश्यक त्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असे शासन आदेशात म्हंटले आहे. [शासन निर्णय येथे पहा]

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post