Pension News : सरकारने पेन्शन संदर्भात घेतला मोठा निर्णय ! 25 वर्षे सेवा केल्यानंतर पूर्ण पेन्शनचा लाभ मिळणार, तर 10 टक्के अतिरिक्त पेन्शन भत्ता..

Government Employees Pension News : सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय असेल किंवा महागाई भत्ता वाढ आणि नुकताच घेतलेला ॲडव्हान्स सॅलरीचा ऐतिहासिक निर्णय असे महत्वाचे निर्णय सरकारने घेतले आहेत, आता अजून एक मोठा निर्णय राजस्थान सरकारने कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेतला आहे, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेतील 28 वर्ष ऐवजी आता 25 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती घेतल्यानंतर पूर्ण पेन्शनचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 6 जून 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घोषित करण्यात आला आहे सविस्तर बातमी पाहूया.

राजस्थान सरकारचे कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट

Government Employees Pension News
Government Employees Pension News

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली असून, त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्क्याने वाढवण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना ऍडव्हान्स सॅलरी देण्याचा निर्णय देखील राजस्थान सरकारने घेतला असून, देशातील असा निर्णय घेणारे हे पहिले राज्य ठरले आहे. [सविस्तर येथे वाचा]

25 वर्षे सेवा केल्यानंतर पूर्ण पेन्शनचा लाभ मिळणार

राजस्थान सरकारने बजेटमध्ये घोषणा केल्याप्रमाणे आता राज्यातील कर्मचाऱ्यांनी 28 वर्ष ऐवजी 25 वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर सेवानिवृत्ती घेतल्यास त्यांना पेन्शनचा पूर्ण लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिनांक 6 जून 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

माननीय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

राजस्थान नागरी सेवा (पेन्शन) नियम 1996 मध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता यामध्ये दुरुस्ती केल्यानंतर कर्मचाऱ्यांना 25 वर्षे सेवा पूर्ण केल्यास निवृत्तीनंतर पूर्ण पेन्शन घेण्याचा लाभ मिळणार आहे.

राजस्थान सरकारच्या प्रसिद्धीपत्रकारानुसार यापूर्वी कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शन वेतन मिळवण्यासाठी सेवेची 28 वर्ष पूर्ण करणे बंधनकारक होते. ते आता तीन वर्षांनी कमी करून 25 वर्ष पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

पेन्शनधारकाच्या मृत्यूनंतरही कुटुंबाला भत्ता मिळणार

या निर्णयांबरोबरच वयाचे 75 वर्ष पूर्ण केलेल्या पेन्शनधारक किंवा त्यांच्या कुटुंबांना 10 टक्के अतिरिक्त पेन्शन भत्ता दिला जाणार आहे.

सरकारने घेतलेला या निर्णयानुसार निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे दरमहा 12 हजार 500 रुपये पर्यंत उत्पन्न असलेल्या पात्र सदस्यांनाही कुटुंब निवृत्ती वेतन लाभ मिळणार आहे, हा निर्णय1 एप्रिल 2023 पासून राज्यातील सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना लागू असणार आहे. [अखेर पगाराचा निधी केला वितरित Read More..]

Previous Post Next Post