RTE Admission Status 2023 : 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 2023 24 अंतर्गत सध्या राज्यांमध्ये प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याचे काम सुरू आहे, RTE लॉटरी मध्ये निवड झालेल्या प्रतीक्षा यादीतील 25 हजार 890 मुलांना प्रवेश घेण्याची संधी मिळाली असून, आतापर्यंत 5 हजार 388 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 12 जून 2023 पर्यंत देण्यात आली आहे.
आरटीई प्रवेश प्रक्रिया 2023 24
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील मुलांना नामांकित खाजगी शाळेत मोफत प्रवेश या योजनेअंतर्गत दिला जातो.
राज्यातील आरटीई प्रवेश प्रक्रिया यंदा जानेवारी महिन्यामध्येच सुरू करण्यात आली असून, 5 एप्रिल 2023 रोजी आरटीई ऑनलाइन सोडत (लॉटरी) जाहीर करण्यात आली आहे.
त्यानुसार राज्यातील 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले होते.
त्यानुसार 94 हजार 700 मुलांची दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी लॉटरीमध्ये निवड करण्यात आली होती, आणि 81 हजार 129 मुलांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली, त्यानुसार कागदपत्रे पडताळणी करून 64 हजार 243 मुलांचे प्रवेश निश्चित करण्यात आले.
त्यानंतर प्रतीक्षा यादीतील 81 हजार 129 विद्यार्थ्यांपैकी रिक्त जागा नुसार प्राधान्य क्रमाने 25 हजार 890 मुलांना आता प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत RTE पोर्टल वरील आकडेवारीनुसार 5 हजार 388 मुलांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
'आरटीई' २५ टक्के अंतर्गत प्रतीक्षा यादीतील २५ हजार ८९० मुलांची निवड
'आरटीई' २५ टक्के प्रवेश करिता प्रतीक्षा यादीतील राज्यातील 25 हजार 890 मुलांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, मुंबई आणि औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात आली आहे.
30 मे पासून प्रवेश घेण्यास सुरुवात
सध्या प्रतीक्षा यादीतील मुलांचे कागदपत्र पडताळणी 30 मे पासून सुरू असून, आतापर्यंत 5 हजार 388 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या मुलांचे प्रवेश निश्चित करण्याची अंतिम मुदत 12 जून 2023 पर्यंत देण्यात आली आहे.
त्यानंतर रिक्त जागा राहिल्या तर पुन्हा अनुक्रमे प्रतीक्षा यादीतील उर्वरित मुलांना प्रवेश घेण्याची संधी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे 12 जून 2023 पर्यंत किती प्रवेश निश्चित होतात हे पहावे लागेल.