RTE Admission 2023 : राज्यात आरटीईच्या 30 हजार 621 जागा रिक्त, 'वेटिंग' लिस्ट मधील मुलांना मिळणार प्रवेश, जिल्हानिहाय रिक्त जागांचा तपशील येथे पहा...

RTE Admission Vacancy 2023 : राज्यातील 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया 2023 24 अंतर्गत लॉटरी मध्ये निवड झालेल्या मुलांचे प्रवेश निश्चित करण्याची मुदत संपली असून, राज्यातील 94 हजार 700 मुलांपैकी आतापर्यंत (दि.25 मे) 64 हजार 74 प्रवेश  निश्चित (Confirmed Admissions) झाले आहेत, तर राज्यात आरटीईच्या 30 हजार 621 जागा रिक्त असल्याचे RTE पोर्टल वर दिसून येत आहे, आता या रिक्त जागांवर 'आरटीई' लॉटरी अंतर्गत प्रतीक्षा (Waiting Selection) यादीतील मुलांना प्रवेशाची संधी मिळणार आहे, याबाबत जिल्हानिहाय रिक्त जागांचा तपशील सविस्तर बातमी पाहूया..

राज्यात आरटीईच्या 30 हजार 621 जागा रिक्त

RTE Admission Vacancy

राज्यातील 'आरटीई' प्रवेश प्रक्रिया अंतर्गत 8 हजार 823 शाळांमधील 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले होते. प्राप्त अर्जाचा विचार करून वंचित व आर्थिक घटकातील मुलांच्या राखीव जागानुसार सन 2023 24 या शैक्षणिक वर्षासाठी  ऑनलाईन सोडत (लॉटरी) 5 एप्रिल 2023 रोजी काढण्यात आली. 

त्यानंतर लॉटरी मध्ये निवड झालेल्या मुलांच्या कागदपत्रांची पडताळणी (दि.13) एप्रिल पासून सुरु करण्यात आली होती, त्यानुसार अंतिम प्रवेश निश्चित करण्याची मुदत 22 मे 2023 पर्यंत देण्यात आली होती. त्यानुसार आतापर्यंत 'आरटीई' पोर्टलच्या आकडेवारीनुसार राज्यातील 94 हजार 700 मुलांपैकी 63 हजार 74 प्रवेश  निश्चित (RTE Confirmed Admissions) झाले आहेत, तर राज्यात आरटीईच्या 30 हजार 621 जागा रिक्त असल्याचे RTE पोर्टल वर दिसून येत आहे. (जिल्हानिहाय आकडेवारी येथे पहा)

'आरटीई' 'वेटिंग' लिस्ट मधील मुलांना आता रिक्त जागांवर मिळणार प्रवेश

'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत लॉटरी जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला पालकांना तांत्रिक अडचणी आल्या त्यांनतर RTE ची पर्यायी वेबसाईट सुरु करून प्रवेश निश्चित करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती, पोर्टलवर अतिरिक्त भार येत असल्याने पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास येत होते. 

तरी याबाबत पालकांनी कोणतीही भीती /संभ्रम बाळगू नये. तसेच ज्या बालकांची प्रवेशासाठी सोडत (लॉटरी) द्वारे निवड झाली आहे अशा बालकांना शाळा प्रवेशाकरिता पुरेसा कालावधी देण्यात येईल असे शासनाने जाहीर केले होते. त्यानुसार लॉटरी मध्ये निवड झालेल्या मुलांच्या 'आरटीई' प्रवेशासाठी 22 मे ही अंतिम मुदत होती. 

निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतर मगच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमएस पाठवले जातील. असे शासनाने परिपत्रक काढून जाहीर केले आहे. त्यानुसार आता पर्यंतच्या रिक्त राहिलेल्या जागांचा आढावा घेऊन ही संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया पार पाडण्यास अजून दोन ते तीन दिवस लागणार आहे. त्यानंतर या रिक्त जागांवर 'आरटीई' 'वेटिंग' लिस्ट मधील मुलांना  प्रवेश मिळणार आहे. सविस्तर येथे वाचा.

'आरटीई' 25 टक्के प्रवेश जिल्हानिहाय 'रिक्त' जागांचा तपशील - टॉप 5 जिल्हे

'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सर्वाधिक रिक्त जागा ह्या पुणे, ठाणे, नागपूर, मुंबई व नाशिक या जिल्ह्यात असल्याचे दिसून येत आहे. 

'आरटीई' रिक्त जागा टॉप 5 जिल्हे

जिल्हा - शाळा - एकूण जागा - निवड - प्रवेश निश्चित - रिक्त जागा

  1. पुणे - 935  - 15596 - 15501-10732 - 4769
  2. ठाणे - 628 - 12263 - 10996 - 7027 - 3969
  3. नागपूर - 653 - 6577 - 6513 - 4267 - 2246
  4. मुंबई - 272 - 5202 - 4343 - 2433 - 1910
  5. नाशिक - 401 - 4854 - 4750 - 3161 - 1589

महाराष्ट्रातील 'आरटीई' पोर्टल वरील दिनांक 25 मे 2023 रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्हानिहाय प्रवेश निश्चित झालेले व सद्यस्थितीत रिक्त असलेल्या जागा पुढीलप्रमाणे (तांत्रिक काम सुरु असल्याने अजून यामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घ्यावी)

RTE Admission Vacancy


Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post