HSC Result Link 2023 : HSC Result : प्रतीक्षा संपली ! बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर, 'या' ठिकाणी पाहता येणार निकाल, डायरेक्ट लिंक...

HSC Result Link 2023 : फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची राज्यातील सर्वच पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते, बारावी बोर्ड परीक्षेचा (HSC Result) निकालाची आता प्रतीक्षा संपली असून दिनांक 25 मे 2023 रोजी हा निकाल दुपारी दोन वाजता जाहीर होणार आहे, सर्वात आधी तुमचा निकाल तुम्ही कुठे पाहू शकता? याबद्दलची सविस्तर बातमी पाहूया..

बारावीचा निकाल उद्या दुपारी दोन वाजता होणार जाहीर

HSC Result Link 2023

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार उद्या दुपारी दोन वाजता जाहीर करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी ) परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत संकेतस्थळांवर गुरूवार दिनांक २५ मे २०२३ रोजी दुपारी २.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. 

'या' ठिकाणी पाहता येणार निकाल, डायरेक्ट लिंक

बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल पुढील अधिकृत वेबसाईटवर उद्या दुपारी 2 वाजता पाहता येणार आहे. 

बारावीचा निकाल सर्वात आधी असा आणि येथे चेक करा

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post