RTE Admission : 'आरटीई' 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी 22 मे पर्यंत अंतिम मुदतवाढ, वाढीव मुदतीच्या कालावधीतील कागदपत्रे ग्राह्य धरणार..

RTE Admission Last Date Maharashtra : 'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी आता शासनाने 22 मे 2023 ही अंतिम मुदतवाढ दिली आहे, ऑनलाईन पोर्टलच्या तक्रारी, बालकांचे कागदपत्रे पडताळणी संदर्भात विविध अडचणी पालकांना येत होत्या, तसेच वाढवून दिलेल्या मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात यावेत, असे शासनाने परिपत्रकात म्हंटले आहे, सविस्तर पाहूया..

'आरटीई' 25 टक्के ऑनलाइन प्रवेश 2023 24

RTE Admission Last Date Maharashtra

बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये राज्यातील आर्थिक व वंचित घटकातील बालकांना 'आरटीई' अंतर्गत खाजगी नामांकित शाळेत मोफत प्रवेश दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2023 24 करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची ऑनलाईन सोडत जाहीर

शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२३-२४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) बुधवार दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी काढण्यात आली आहे.

'आरटीई' 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी 22 मे पर्यंत अंतिम मुदतवाढ

RTE लॉटरी निवड यादीतील बालकांचे प्रवेश दिनांक 13 एप्रिल 2023 ते 15 मे 2023 पर्यंत मूदतवाढ देण्यात आली आहे. यामध्ये वाढ करून शालेय शिक्षण विभागाने आता 22 मे 2023  ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. (RTE Admission Last Date Maharashtra)

सदर प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करणे व प्रवेश निश्चितीकरीता आता दिनांक 22 मे 2023 ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाढीव मुदतीच्या कालावधीतील कागदपत्रे ग्राह्य धरणार

RTE प्रवेशासाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी पालकांना अडचणी येत होत्या, यासंदर्भात आता शासनाने कागदपत्रे ही वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात येणार आहे.

महत्वाचे - सदर वाढीव मुदतीच्या कालावधीतील दाखले (कागदपत्रे) ग्राह्य धरण्यात यावेत, असे परिपत्रकात म्हंटले आहे. त्यामुळे आता पालकांना दिलासा मिळाला आहे.{alertInfo}

'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाची दुसरी फेरी

दिनांक 22 मे 2023 नंतर सन 2023 24 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. सविस्तर येथे वाचा..

Previous Post Next Post