RTE Admission : 'आरटीई' 25 टक्के प्रवेश नाकारल्यास शाळांवर कारवाई होणार, परिपत्रक जारी येथे पहा..

RTE Admission Maharashtra 2023-24 : 'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत निवड झालेल्या बालकांचे प्रवेश संदर्भात एक महत्वाचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे, राज्यातील बऱ्याच शाळा RTE Admission साठी वेगवेगळे कारणे देऊन नाकारत आहे, यासंबंधी पालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, आता यासंदर्भात 'आरटीई' 25 टक्के अंतर्गत बालकांचे प्रवेश नाकारल्यास RTE Act 2009 नुसार संबंधित शाळांवर कारवाई होणार आहे, या परिपत्रकामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. सविस्तर बातमी पाहूया..

'आरटीई' 25 टक्के प्रवेश आतापर्यंत काय झाले?

RTE Admission Maharashtra

शिक्षण हक्क कायद्यानुसार नुसार दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. यंदा जानेवारी महिन्यात राज्यातील RTE शाळांना नोंदणी करून घेण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च महिन्यात पालकांना RTE प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज RTE Portal वर भरण्याची प्रक्रिया पार पडली.

राज्यात RTE अंतर्गत 8 हजार 823 शाळांमधील 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले.  त्यानुसार सन 2023 24 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) 5 एप्रिल 2023 रोजी काढण्यात आली आहे. (RTE Admission Maharashtra)

लॉटरी पद्धतीने काढलेल्या सोडतीनुसार राज्यातील 94 हजार 700 मुलांची RTE प्रवेशासाठी अंतिम Selection List जाहीर करण्यात आली असून, प्रतीक्षा यादीत (Waiting Selection) 81 हजार 129 बालकांची यादी पोर्टल वर जाहीर करण्यात आली आहे. Live कार्यक्रम येथे पहा

लॉटरी निवड यादीतील पालकांना 12 एप्रिल 2023 रोजी दुपारी 4 नंतर पालकांना मेसेज SMS पाठवण्यात आले आहे. व त्यानुसार 13 एप्रिल 2023 पासून कागदपत्रे पडताळणी सुरु आहे, यासाठी आता दोन वेळा मुदत वाढवून देण्यात आली आहे. आता शेवटची मुदत 15 मे 2023 आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील पालकांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. सविस्तर वाचा..

त्यांनतर पालकांच्या 'आरटीई' 25 टक्के प्रवेश पोर्टलवर अतिरिक्त भार येत आल्यामुळे पालकांना तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले, यादरम्यान RTE प्रवेशासाठी दुसरी पर्यायी वेबसाईट सुरु करण्यात आली. आता  पर्यंत राज्यातील 54 हजार 196 प्रवेश निश्चित झाल्याचे ऑनलाईन पोर्टल वर दिसून येत आहे. 

'आरटीई' 25 टक्के प्रवेश नाकारल्यास शाळांवर कारवाई होणार

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, (RTE Act 2009) मधील कलम 12 (1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

तथापि काही जिल्हयामध्ये काही शाळा आपल्या शाळे बाहेर बॅनर / बोर्ड लावून आरटीई 25 टक्के अंतर्गत शैक्षणिक शुल्क प्रति पूर्ती शासनाकडुन रक्कम न मिळाल्यामुळे बालकांचे प्रवेश नाकारत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे यांच्याकडे प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने शासनाने याबाबत एक परिपत्रक काढून ही बाब गंभीर असल्याचे म्हंटले आहे, तसेच याबाबत जिल्हयांकडील शुल्क प्रतिपूर्तीच्या मागणीच्या अनुषंगाने शासनाकडे शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीबाबत पाठपुरावा सुरु असून शासनाकडून सदरचा निधी प्राप्त झाल्यानंतर सर्व जिल्हयांना वितरीत करण्यात येईल असे परिपत्रकात म्हंटले आहे. (RTE Admission Maharashtra)

'आरटीई' 25 टक्के दुसरी फेरी 'या' तारखेला सुरु होणार येथे पहा

तरीही शाळा आरटीई २५ टक्के अंतर्गत बालकांचे प्रवेश नाकारत असतील तर ही बाब गंभीर आहे. तरी अशा सर्व शाळांनी पालकांना प्रवेशासाठी योग्य ते सहकार्य करुन बालकांना शाळेत दाखल करुन घेण्यात यावे व बालकांचे कोणतेही शैक्षणिक नुकासान होणार नाही याची दक्षता घ्यावी. 

अशा सर्व शाळांनी पालकांना प्रवेशासाठी निवड झालेल्या शाळेत निश्चित केल्याची पडताळणी समितीच्या सही शिक्क्याची शाळेकरीता असलेली प्रवेश पावती देण्यात आलेली आहे. अशा सर्व बालकांना संबंधित शाळेने प्रवेश देणे अनिवार्य आहे. ज्या शाळा / संस्था आरटीई 25 टक्के अंतर्गत पात्र झालेल्या बालकांना प्रवेश नाकारत आहेत, अशा शाळांविरोधात आरटीई अधिनियम, नियम, शासन निर्णय, परिपत्रक शासन पत्र अन्वये दिलेल्या निर्देशाप्रमाणे कारवाई करण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता पालकांना दिलासा मिळाला आहे.

'आरटीई' 25 टक्के दुसरी फेरी 'या' तारखेला सुरु होणार येथे पहा

'आरटीई' 25 टक्के प्रवेश नाकारल्यास शाळांवर कारवाई होणार, परिपत्रक येथे पहा.

Previous Post Next Post