'आरटीई' प्रवेशाची वेबसाईट हँग, आता 'ही' नवीन पर्यायी वेबसाईट केली सुरु येथे पहा..

RTE Admission New Portal 2023 24 : 'आरटीई' 25 टक्के 2023 24 च्या प्रवेश प्रक्रियेसाठी नुकतीच लॉटरीची सोडत काढण्यात असून, राज्यातील 8 हजार 823 शाळांमधील RTE जागांसाठी राज्यभरातून 3 लाख 64 हजार 413 अर्ज प्राप्त झाले होते, त्यानुसार लॉटरी पद्धतीने RTE ची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली, पालकांना Admit Card Downlod करण्यासाठी किंवा अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी RTE Portal सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होत होते, त्यामुळे आता पर्यायी RTE वेबसाईट सुरु करण्यात आली असून, त्यावर पालक आता RTE च्या संपूर्ण प्रक्रियेची स्थिती तपासून पाहू शकता, याबद्दलची माहिती पाहूया..

'आरटीई' अंतर्गत 94 हजार 700 बालकांची प्रवेशासाठी निवड

RTE Admission New Portal

'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023 24 साठी राज्यातील RTE च्या 8 हजार 823 शाळांसाठी राज्यातून 3 लाख 64 हजार 413 अर्ज आले होते, त्यातून लॉटरी काढण्यात आली असून यापैकी लॉटरी पद्धतीने 94 हजार 700 बालकांची निवड झाली असून, 81 हजार 129 विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहेत. 

'आरटीई' प्रवेश प्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून आता 25 एप्रिल पर्यंत निवड झालेल्या बालकांचे कागदपत्रे पडताळणी संबंधित तालुका/मनपा शिक्षण समिती कडून करण्यात येणार असून 30 एप्रिल 2023 पर्यंत पालकांना संबंधित शाळेत प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनतर रिक्त जागेचा विचार करून प्रतीक्षा यादीतील पालकांना मेसेज SMS पाठवण्यात येणार आहे.

'आरटीई' लॉटरी निवड व प्रतीक्षा यादी PDF येथे डाउनलोड करा

'आरटीई' साठी आता पर्यायी वेबसाईट | RTE Admission New Portal 2023 24 

RTE Lottery Result 2023 24 List जाहीर झाल्यांनतर पालकांना 12 तारखेला प्रवेशाचे SMS मिळाले, मात्र काही पालकांना मेसेज न मिळाल्याने अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी एकदमच राज्यभरातून सर्वच पालक पोर्टल वर भेट देत होते, मात्र दोन दिवस होऊन गेले तरी पोर्टल सातत्याने स्लो असल्यामुळे 'आता' https://student.maharashtra.gov.in/adm_portal/users/rteindex ही पर्यायी नवीन वेबसाईट सुरु करण्यात आली आहे.

'आरटीई' प्रवेशासाठी पर्यायी वेबसाईट येथे पहा


नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.
   
Previous Post Next Post