Video : चांगली शाळा बांधून देण्याची 'थेट' पंतप्रधानांना केली विनंती, शाळकरी मुलीचा व्हिडिओ व्हायरल येथे पहा..

Viral Video Girl News : सध्या सोशल मिडिया वर एका शाळकरी मुलीचा Video तुफान Viral होत आहे, या व्हिडिओ मध्ये मुलीने चांगली शाळा बांधून देण्याची 'थेट' पंतप्रधानांना केली विनंती केली आहे, 'आम्हाला चांगली शाळा बांधून द्या, येथे बसून आमचे कपडे खराब होतात, त्यामुळे आई ओरडते, असे ती व्हिडिओ मध्ये सांगत आहे, छोट्याशा Video मधून तिने संपूर्ण शाळेचे वास्तव चित्र दाखविले असून या मुलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, Viral Video Girl News नक्की काय आहे सविस्तर पाहूया..

शाळकरी मुलीचा व्हिडिओ व्हायरल | Viral Video Girl News

Viral Video Girl News

जम्मू-काश्मीर मधील कठुआ येथील लोहाई मलहार गावातील हायस्कूल मध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीचा व्हिडिओ सोशल मिडिया वर व्हायरल होताना दिसत असून, Video पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहे.

या व्हिडिओ मध्ये तिने थेट देशाचे मा पंतप्रधान मोदीजी यांना चांगली शाळा बांधून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला असून विविध सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

तुम्ही संपूर्ण देशाचे ऐकता, माझेही ऐका

Viral Video मध्ये मुलगी म्हणते की, मोदीजी, आमची शाळा खूप गलिच्छ आहे, आमचे कपडे खराब होतात, आई आम्हाला रागवते. कृपया चांगली शाळा बनवा. ती पूर्णपणे सुंदर बनवा, जेणेकरून आम्हाला खाली बसावे लागणार नाही. आमचे कपडे घाण होणार नाही. त्यामुळे आई रागवणार नाही. जेणेकरून आम्ही नीट अभ्यास करु. प्लीज आमची शाळा चांगली करा. 

या व्हिडीओमध्ये मुलगी सुरुवातीला तिचे नाव सीरत नाज आहे असे सांगते. गावातील सरकारी हायस्कूल शाळेत शिकणारी विद्यार्थिनी असे ती स्वतःचे वर्णन करते. यानंतर ती संपूर्ण शाळेचे चित्र व्हिडिओ मध्ये दाखवते. 

दरम्यान सीरत म्हणते मोदीजी, बघा आमच्या शाळेची फरशी किती घाण झाली आहे. आम्ही इथेच बसतो. सीरत पुढे म्हणते की, हे बघा, गेली 5 वर्षे बघा, इथली इमारत किती घाणेरडी आहे, मी तुम्हाला आतून दाखवते. त्यानंतर ती तुटलेले शाळेचे शौचालय दाखवते. 

अशा प्रकारे ती वास्तव स्थिती व्हिडिओ च्या माध्यमातून चांगली सुंदर सोयी सुविधा असणारी शाळा बनवावी अशी ती आवाहन करत आहे.

Viral Video Girl

Latest Viral Video of Girl

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

   


Previous Post Next Post