सरकारने घेतला महत्वपूर्ण निर्णय, राज्यातील 27 लाख नागरिकांना 'थेट' मिळणार विविध सरकारी योजनांचा लाभ..

Government Schemes 2023 : राज्यातील नागरिकांचे जनकल्याणासाठी सरकार सातत्याने विविध योजना राबवीत असते, बऱ्याच जणांना सरकारी योजनांची माहिती नसते तसेच माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्ण होत नाही, त्यामुळे 'आता' नागरिकांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास किमान 27 लाख नागरिकांना लाभ मिळणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहूया..

राज्यातील 27 लाख नागरिकांना मिळणार ‘शासकीय योजनांचा’ लाभ

government schemes

राज्य सरकारने नुकतेच ‘शासकीय योजनांची जत्रा’ अभिनव उपक्रम राज्यात सुरु केला असून, त्यांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून किमान 75 हजार नागरिकांना सरकारी योजनाचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. असे राज्यातील एकूण 36 जिल्ह्यातून किमान 27 लाख नागरिकांना सरकारी योजनेचा लाभ मिळणार आहे.

कमी वेळात विविध सरकारी योजनांचा मिळणार लाभ

राज्यातील नागरिकांच्या जनकल्याणासाठी अनेक योजना घोषित करण्यात येतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, आवश्यक कागदपत्रे सबंधित कार्यालयात जाऊन जमा करणे, कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते.

संबधित कार्यालये वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागते. कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दूर करण्यासाठी वारंवार त्या कार्यालयामध्ये जावे लागते. 

कित्येक वेळा अनेक लोकांना त्यांना शासनाकडून देय असलेल्या योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे या योजनांचा उद्देश पूर्ण होत नाही. नागरिकांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

यावर पर्याय म्हणून चाळीसगाव, जामनेर, मुरबाड, कल्याण इत्यादी ठिकाणी 'जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची' नावाचा अभिनव व पथदर्शी उपक्रम  राबविण्यात आला आहे. या उपक्रमात एकाच ठिकाणी नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कमीत कमी कालावधीत देण्यात आला आहे.

जिल्हा व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन होणार

‘शासकीय योजनांची जत्रा’ हा राज्य शासनाचा अभिनव उपक्रम 'जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची' या धर्तीवर सुरु करण्यात आला आहे. देशाच्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.

त्यानुसार आता सर्वसामान्य जनतेला सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी 'आता' जिल्हा व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन होणार आहे.

सर्व शासकीय विभाग येणार एका छताखाली

या अभियानात नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ देतील. जिल्हाधिकारी हे अभियानाचे जिल्हा प्रमुख असतील व इतर सर्व विभाग हे त्यांच्या समन्वयाने काम करतील. 

या उपक्रमाची पूर्वतयारी 15 एप्रिल ते 15 मे 2023 या कालावधीत  करण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती पोहचविणे, प्रस्तावित लाभार्थ्यींची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्यात येणार आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75 हजार लाभार्थ्यींना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट असून, लाभार्थ्यींना लाभ देण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे जनकल्याण कक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे.

महत्वाच्या योजना

नवनविन अपडेट साठी  Whatsapp ग्रुप जॉईन करा.

                                                            
Previous Post Next Post