RTE Second Round Date : 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची ऑनलाईन सोडत जाहीर, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना 'या' तारखेला एसएमएस मिळणार..

RTE Admission Second Round Date 2023 : 'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023 24 मधील प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशासंदर्भात पालकांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, RTE Lottery Result जाहीर झाल्यानंतर ज्या मुलांचा नंबर वेटिंग लिस्ट मध्ये आहे, त्या शाळेतील रिक्त जागेनुसार प्रतीक्षा यादीतील क्रमाने आता मोबाईल वर लवकरच एसएमएस पाठविण्यात येणार आहे. 'आरटीई' (RTE Second Round) च्या दुसऱ्या फेरीला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती शिक्षण संचनालय पुणे कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे, याबद्दलची सविस्तर बातमी पाहूया..

'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची ऑनलाईन सोडत जाहीर

RTE Admission Second Round Date 2023

शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार दरवर्षी प्रमाणे 'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रीया संपुर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2023 24 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) 5 एप्रिल 2023 रोजी काढण्यात आली आहे.

लॉटरी कशा पद्धतीने काढली जाते येथे पहा

सन 2023 24 शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या निवड यादीतील बालकांच्या कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करण्यासाठी व बालकांच्या पालकांना प्रवेशासाठी दिनांक 15 मे 2023 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. सविस्तर वाचा.. 

सदर प्रकरणी कागदपत्रांची तपासणी करणे व प्रवेश निश्चितीकरीता आता दिनांक 22 मे 2023 ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

तसेच प्रलंबित असलेल्या प्रवेशाबाबतच्या तक्रारी व अपील अर्जाबाबत सुनावणी 15 मे 2023 पूर्वी निकाली काढण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे यांनी संबंधित विभागास कळविले आहे. त्यामुळे आता निवड झालेल्या पालकांना आता प्रवेशासाठी 22 मे ही शेवटची मुदत आहे. RTE Admission Second Round Date 2023

'आरटीई' 25 टक्के प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना 'या' तारखेला एसएमएस मिळणार

'आरटीई' 25 टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत ऑनलाईन सोडतीद्वारे निवड झालेल्या प्रतिक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया 22 मे 2023 नंतर सुरु करण्यात येणार आहे. RTE Admission Second Round Date 2023

सन २०२३ २४ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई प्रवेशाची ऑनलाइन सोड 5 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली.  आता लॉटरीमध्ये वेटिंग लिस्ट वर असलेल्या बालकांच्या म्हणजेच RTE च्या दुसऱ्या फेरीतील (RTE Admission Second Round) प्रवेशासाठी पालकांना 22 मे 2023 नंतर शाळानिहाय रिक्त असलेल्या जागानुसार व वेटिंग लिस्ट मधील क्रमांकानुसार पालकांना मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवले जाणार आहे.

 'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची अंतिम तारीख येथे पहा
'आरटीई' 25 टक्के प्रवेशाची प्रतीक्षा यादी PDF येथे पहा
आरटीई ऑनलाईन प्रवेशाची स्थिती येथे चेक करा

संबंधित बातम्या 

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 



Previous Post Next Post