Advance Salary : ऐतिहासिक निर्णय ! सरकारी कर्मचाऱ्यांना आता 'ॲडव्हान्स पगार' मिळणार, देशात पहिल्यांदाच लागू होणार 'ही' योजना..

Government Employees Advance Salary : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी, जुनी पेन्शन योजना, महागाई भत्ता, पदोन्नती संदर्भात केंद्र व राज्य सरकार सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे, आता या संदर्भात आणखी एक मोठा निर्णय, सरकारी कर्मचाऱ्यांना ऍडव्हान्स पगार देण्याबाबतचा घेतला आहे, आता सरकारी कर्मचारी महिना संपण्याआधीच आपल्या पगाराचे अग्रीम वेतन उचलू शकणार आहेत, हा निर्णय 1 जून 2023 पासून लागू करण्यात आला आहे सविस्तर बातमी पाहूया..

सरकारी कर्मचाऱ्यांना आता एडवांस पगार मिळणार

Government Employees Advance Salary

केंद्रपाठोपाठ राजस्थान राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4 टक्के वाढीचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वीच राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देखील लागू करण्यात आलेली आहे. आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पुन्हा एक मोठा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे. [Government Employees Advance Salary]

सरकारी कर्मचाऱ्यांना ऍडव्हान्स पगार देण्याबाबतचा निर्णय घेतलेले राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यस्थान राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला आहे.

ॲडव्हान्स पगार निर्णय 1 जून अमलात येणार

राजस्थान राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना ऍडव्हान्स पगार देण्याबाबतचा निर्णय 1 जून 2023 रोजी जाहीर केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा अग्रिम वेतन यावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारण्यात येणार नसून, हे पूर्णतः बिनव्याजी असणार आहे. [बिनव्याजी शैक्षणिक कर्ज येथे पहा]

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना हा निर्णय 1 जून 2023 पासून लागू करण्यात आला आहे. आता महिना संपण्याआधी म्हणजे महिन्याच्या 20 तारखेपर्यंत कर्मचारी अग्रिम वेतन मिळण्यासंदर्भात अर्ज करू शकणार आहे. [सातव्या वेतन आयोगाची थकबाकी कधी मिळणार पहा]

राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी यांच्यासाठी ही योजना फायनान्शियल सर्व्हिस डिलिव्हरी लिमिटेड मार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्थविभागाने नॉन बँकिंग फायनन्स कंपनीसोबत करार केला आहे.

कर्मचाऱ्यांना आपल्या पगारातील 20 हजार रुपयांर्यंत अग्रिम वेतन काढता येणार आहे. याबाबतचा अर्ज 21 तारखेच्या आत करावा लागणार असून, पुढील महिन्याच्या पगारातून अग्रिम वेतन कपात करण्यात येणार आहे.

जुनी पेन्शन योजना लेटेस्ट अपडेट येथे पहा

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post