Government Employee Transfer Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सुधारित धोरण निश्चित, संवर्गबाह्य विनंती बदलीच्या महत्वाच्या तरतुदी, पहा शासन निर्णय

Government Employee Transfer Rules : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या संदर्भात एप्रिल, मे महिना म्हटलं की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बदलीचा महिना म्हणून ओळखला जातो, राज्यातील वेगवेगळ्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया या कालावधी मध्ये राबवली जाते, जर तुम्हाला दुसऱ्या विभागांमध्ये दुसऱ्या पदावर संवर्गबाह्य बदली विनंती करायची असेल, तर त्यासाठी शासनाने सुधारित धोरण यापूर्वीच निश्चित केलेले आहे, त्याविषयीची माहिती पाहूया..

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीचे सुधारित धोरण

Government Employee Transfer Rules

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विनंती वरून संवर्गबाह्य बदली मिळवण्याबाबत, राज्यातील सरकारी कर्मचारी संघटना तसेच विविध प्रशासकीय विभागाकडून कर्मचाऱ्यांच्या विनंती संवर्गबाह्य बदल्या करण्यासंदर्भात शासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव मागणी करण्यात आली होती, त्या अनुषंगाने शासनाने 3 जून 2011 रोजी याबाबतचे बदली धोरण निश्चित केले आहे. [सातवा वेतन आयोग थकबाकी शासन निर्णय येथे पहा]

संवर्गबाह्य विनंती बदलीच्या महत्वाच्या तरतुदी

विनंतीवरुन / संवर्गबाहय बदली करण्यासाठी 3 जून च्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरणातील अटी व शर्ती पुढीलप्रमाणे  {Government Employee Transfer Rules}
  1. विनंतीवरुन, संवर्गबाहय बदली केवळ त्याच पदावर अथवा समकक्ष पदावर करता येईल. 
  2. अपवादात्मक परिस्थितीत कनिष्ठ (वेतनश्रेणी) वेतनबैंड व ग्रेड पे मधील पदावर बदली करता येईल. मात्र, ज्या पदांकरीता विशिष्ट तांत्रिक वा अन्य अर्हता विहित केली असेल व स्वतंत्र निवडप्रक्रीया अवलंबण्यात येत असेल अशा संवर्गबाहय पदावर बदली अनुज्ञेय होणार नाही. [सुधारित वेतनश्रेणी येथे पहा]
  3. संबंधित कर्मचाऱ्याची नियुक्ती नियमित असावी व त्याला / तिला स्थायित्व प्रमाणपत्र देण्यात आले असावे.
  4. संबंधित कर्मचाऱ्याची किमान ५ वर्षे सेवा पूर्ण झाली असावी. 
  5. अपवादात्मक परिस्थितीत हा कालावधी २ वर्षे इतका शिथिल करता येईल म्हणजेच किमान ३ वर्षे सेवा पूर्ण झाली असल्यास अपवादात्मक परिस्थितीत विनंती विचारात घेता येईल.
  6. विनंतीवरुन, संवर्गबाहय बदली जिल्हास्तरावर बदलीपात्र पदधारकांच्या बाबतीत केवळ अन्य जिल्हयातील संबंधित विभागप्रमुखांच्या अधिपत्याखालील कार्यालयात अथवा अन्य विभागप्रमुखांच्या अधिपत्याखालील कार्यालयात करता येईल आणि महसूली विभागस्तरावर बदलीपात्र पदधारकांच्या बाबतीत अन्य महसूली विभागातील संबंधित विभागप्रमुखांच्या अधिपत्याखालील कार्यालयात अथवा अन्य विभागप्रमुखांच्या अधिपत्याखालील कार्यालयात करता येईल. 
  7. प्रशासनाचे हित, सार्वजनिक सेवेचे हित विचारात घेऊन बदली करता येईल. 
  8. संबंधित कर्मचारी ज्या कार्यालयात कार्यरत असेल त्या कार्यालयाच्या विभागप्रमुखांनी तसेच ज्या कार्यालयात बदलीबाबत विनंती केली आहे त्या विभागप्रमुखांनी बदलीसंदर्भात ना-हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.
  9. ज्या पदावर बदलीबाबत विनंती केली आहे ते पद निर्बाध रिक्त असणे आवश्यक राहील. तसेच 
  10. संबंधित कर्मचा-याने समान पदावर बदलीबाबत विनंती केली असल्यास त्याची ज्या मार्गाने (उदा:- पदोन्नती, नामनिर्देशन) नियुक्ती झाली आहे त्या कोटयातील पद उपलब्ध असणे आवश्यक राहील. मात्र 
  11. कर्मचा-याने अन्य समकक्ष अथवा निम्न पदावर बदलीबाबत विनंती केली असल्यास सरळसेवा कोटयातील पद उपलब्ध असणे आवश्यक राहील. तसेच 
  12. संबंधित कर्मचारी ज्या प्रवर्गातील आहे (उदा:- खुला प्रवर्ग, अ.जा., इ.) त्या प्रवर्गाचे पद उपलब्ध असणे आवश्यक राहील.
  13. ज्या पदावर बदलीबाबत विनंती केली आहे त्या पदाच्या सेवाप्रवेश नियमातील तरतुदी तसेच त्या पदास विहित केलेल्या परीक्षा व अन्य बाबींची पूर्तता करणे आवश्यक राहील.
  14. संबंधित कर्मचा-याची बदलीनंतर त्या पदावरील ज्येष्ठता रुजू झालेल्या दिनांकास निश्चित होईल. तसेच पुर्वीच्या सेवेचा लाभ वेतननिश्चिती, रजा, निवृत्तीवेतन याकरीता वित्त विभागाच्या संबंधित नियमातील तरतुदीनुसार अनुज्ञेय होईल.
  15. या बदलीच्या अनुषंगाने, पदग्रहण अवधी, बदली अनुदान, प्रवास भत्ता वा तद्नुषंगिक लाभ अनुज्ञेय होणार नाहीत. 
  16. लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदावर बदलीसंदर्भात लोकसेवा आयोगाची मान्यता आवश्यक राहील.
  17. वरीलप्रमाणे विहित केलेल्या सर्व अटी मान्य असल्याचे संबंधित कर्मचा-यांकडून लेखी स्वरुपात (बंधपत्र) घेणे आवश्यक राहील.
  18. अशा बदल्यांचे अधिकार, बदलीच्या अधिनियमात नमूद सक्षम प्राधिका-यांना राहतील. 

शासन निर्णय PDF येथे डाउनलोड करा

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post