7th Pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात तब्बल 9% टक्क्यांची केली वाढ, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय..

DA Hike Latest News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, महाराष्ट्र राज्यातील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्यात तब्बल 9% टक्के वाढ करण्यात आली आहे, दिनांक 6 जून 2023 रोजी काढलेल्या आदेशान्वये आता 1 जानेवारी 2023 पासून सदर महागाई  भत्ता लागू असणार असून, महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ !

DA Hike Latest News

केंद्र शासनाच्या कार्मिक लोक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या 6 एप्रिल 2023 च्या ज्ञापनानुसार आता महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतन धारकांना 4% महागाई भत्त्यातील (Dearness Relief) दरवाढ व ज्ञापनात नमूद केलेल्या इतर तरतूदी लागू करण्याचा महत्वपर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

हा महत्वपूर्ण निर्णय राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना 1 जानेवारी 2023 पासून 42% प्रमाणे महागाई भत्ता अनुदेय करण्यात आला आहे.(शासन निर्णय येथे पहा)

महागाई भत्यात तब्बल 9% टक्क्यांची केली वाढ

DA Hike Latest News : केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय, दुय्यम विभागाचे कार्यालयीन आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्यांसंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

विधी व न्याय विभागाने 6 जून 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दि. 1 जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आलेली 9% (212% ते 221%) महागाई भत्त्यातील (Dearness Allowance) वाढ व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू असणार आहे. [महागाई भत्यात तब्बल 8 टक्के वाढ येथे पहा

त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील दि.1 जानेवारी 2016 पूर्वी सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना दि.1 जानेवारी 2023 पासून 212% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे. [शासन निर्णय येथे पहा]

आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात लवकरच वाढ करण्यात येणार असून, 42% प्रमाणे महागाई भत्ता दिनांक 1 जानेवारी 2023 पासून लागू होण्याची दाट शक्यता आहे. [सविस्तर येथे पहा]

'जुनी पेन्शन योजना' समितीचा अहवाल शासनास सादर येथे पहा
'आरटीई' 25 टक्के लेटेस्ट अपडेट येथे पहा
ऐतिहासिक निर्णय ! 'ॲडव्हान्स पगार' 1 जूनपासून येथे क्लिक करा

पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post