One State One Uniform Scheme : नवीन शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य एक गणवेश योजना' होणार लागू, शालेय शिक्षणमंत्री यांची माहिती

One State One Uniform Scheme : राज्यातील विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश, एक राज्य एक गणवेश योजना राबवण्याबाबत सरकारने निर्णय घेतला असून, आता महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश असणार आहे, त्याचबरोबर शासनामार्फत विद्यार्थ्यांना बूट आणि सॉक्स देखील मोफत दिले जाणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मीडियाशी बोलताना दिली, एक राज्य एक गणवेश योजना काय आहे सविस्तर बातमी पाहूया..

एक राज्य एक गणवेश योजना होणार लागू - शिक्षणमंत्री दीपक केसरकर

One State One Uniform Scheme

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने राज्यातील शासकीय शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने (New Academic Year) नव्या शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजना राबवली जाणार आहे. यामध्ये राज्यातील शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश असणार आहे व सोबतच विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स देखील देण्याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री यांनी मीडियाशी बोलताना दिली.

चालू शैक्षणिक वर्षापासून एक राज्य एक गणवेश योजना

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने राज्यातील शासकीय शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत घोषणा केली आहे. त्याअनुषंगाने शैक्षणिक वर्षापासून 'एक राज्य एक गणवेश योजना' (One State One Uniform Scheme) राबवली जाणार आहे. यामध्ये राज्यातील शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच रंगाचा गणवेश असणार आहे व सोबतच विद्यार्थ्यांना बूट व सॉक्स देखील देण्याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री यांनी मीडियाशी बोलताना दिली. [राज्यातील शाळा 'या' दिवशी सुरु होणार येथे पहा]

सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की, राज्यातील काही शाळांनी मुलांच्या गणवेश शिलाई संदर्भातील ऑर्डर दिल्या असल्यामुळे आता आठवड्यातील सोमवार मंगळवार व बुधवार या तीन दिवशी शाळेने निश्चित केलेला गणवेश मुलांना परिधान करता येणार आहे. तर गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या दिवशी एक राज्य एक गणवेश योजनेअंतर्गत निश्चित केलेला गणवेश परिधान करणे आवश्यक आहे. [मोफत गणवेश योजना सविस्तर बातमी येथे वाचा]

'या' रंगाचा गणवेश एक राज्य एक गणवेश अंतर्गत मिळणार

'एक राज्य एक गणवेश योजना' राबवण्यामागचा उद्देश हा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होण्याच्या उद्देशाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

One State One Uniform Scheme या योजेअंतर्गत मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट व गडद निळ्या रंगाची पँट असणार आहे. तर मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि डार्क निळ्या रंगाचा स्कर्ट असणार आहे. जर शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची आणि कमीज आकाशी रंगाची असं असेल असंही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितलं. 

नवीन शैक्षणिक धोरण 'येत्या' वर्षांपासून राज्यात होणार लागू पहा


Previous Post Next Post