गूड न्यूज ! शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना मिळणार गणवेश; 423 कोटी रुपयाच्या अनुदानास राज्य सरकारची मंजुरी - शिक्षणमंत्री

Free Uniform Scheme 2023 : राज्यातील शालेय विद्यार्थी आणि पालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे, अर्थसंकल्पात घोषणा केल्यानुसार आता राज्यातील पहिली ते आठवी च्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व प्रवेगाच्या मुलांना नवीन शैक्षणिक वर्षातील शाळेच्या पहिल्या दिवशी मोफत गणवेश (School Uniform ) मिळणार आहे, यासाठी राज्य शासनाने नुकतेच 423 कोटी रुपयाच्या अनुदानास मंजुरी दिली आहे, याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया..

शाळांना उन्हाळी सुट्टी लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे घेणार शिलाई मापे

Government Uniform Scheme 2023

पुढील शैक्षणिक 2023 24 वर्षांमध्ये मोफत गणवेश योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी 2021-22 च्या UDISE संख्येनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमधील लाभार्थी संख्येच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांची शिलाई मापे घेण्यासाठी शाळांना उन्हाळी सुट्टी मिळण्यापूर्वी ही प्रक्रिया करण्यात यावी असे राज्य शासनाकडून सांगण्यात आले आहे, त्यामुळे आता 12 जून 2023 या शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळणार आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी मिळणार विद्यार्थ्यांना गणवेश

दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना अंतर्गत मुलांना मोफत गणवेश दिले जातात. दरवर्षी विद्यार्थ्यांचे शिलाई माप घेऊन ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास खूप वेळ यामध्ये निघून जातो. दरवर्षी 15 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळत असतात. 

मात्र यावर्षी शासनाने शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना गणवेश मिळावेत यासाठी आतापासूनच  तयारी सुरू केली आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टी लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या कपड्यांचे माप घेतले जाणार आहे, त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गणवेश मिळणार आहे. 

राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर करून नवीन वर्षातील शाळा या 12 जूनपासून पुन्हा सुरु होणार असल्याबाबत कळविले आहे. सविस्तर येथे वाचा 

मोफत गणवेश योजना कोणासाठी आहे?

केंद्र सरकारच्या समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मोफत गणवेश योजना राबवली जाते, यापूर्वी या योजनेचा लाभ हा स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 1 ली ते 8 वी मध्ये शिकणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती मुले, अनुसूचित जमाती मुले आणि दारिद्र्यरेषेखालील पालकांच्या बालकांना या मोफत गणवेश योजनेचा लाभ दिला जात होता. 

मात्र आता यावर्षीच्या अर्थसंकल्पात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात 2023 24 मध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार आता राज्य शासनाने 423 कोटीच्या निधीस मंजुरी दिली आहे.

मोफत गणवेश योजनेसाठी निधी मंजूर 

शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गणवेश मिळावे यासाठी  राज्य शासनाने  पहिले ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळावेत यासाठी राज्य सरकारकडून ४२३ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली.

या निमित्त रोजगारांची मोठी संधी

शालेय मुलांना सरकार मार्फत मोफत गणवेश देण्याची योजना आहे, यानिमित्ताने गावातील शिलाई चे काम करणारे तरुण यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आहे.

पुढील शैक्षणिक वर्षात राज्यातील जवळपास 70 लाख विद्यार्थ्यांना गणवेश दिले जाणार आहे, आणि त्यांचे शिलाई मापे शाळेला सुट्टी लागण्या पूर्वीच घेण्यात येणार आहे.

राज्य सरकारने साधारणपणे प्रती गणवेश 600 रु प्रमाणे जवळपास 423 कोटी रुपये मंजूर केले आहे. हे अनुदान शाळा स्तरावर येणार असून, गणवेशाचा रंग व कापड निश्चित करून  शाळा व्यवस्थापन समिती मुलांचे कपडे शिलाई करून घेणार आहे, यानिमित्ताने किमान आपल्या गावातील गरजूंना यानिमित्ताने रोजगारांची संधी उपलब्ध झाली आहे.

हे सुद्धा वाचा

नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                                              

Previous Post Next Post