Old Pension Scheme : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार? अभ्यास समितीने मागितली सविस्तर माहिती..

Old Pension Scheme News : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात नेमलेल्या अभ्यास समितीची मुदत दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी संपली आहे, सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा कधी करणार आहे? याबाबत राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे, आता यासंदर्भात अपडेट अशी आहे की, राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (National Pension System) व जुनी निवृत्तीवेतन योजना (Old Pension Scheme) यांचा तुलनात्मक अभ्यास करत असलेल्या समितीने सविस्तर माहिती सादर करणेबाबत कळविण्यात आले आहे. सविस्तर वाचा..

$ads={1}

राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार?

Old Pension Scheme News

राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना (Old Pension Scheme) यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी मा मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे. प्रस्तुत समितीस दिनांक १ नोव्हेबर २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस, अहवाल शासनास सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार का? हे लवकरच समजणार आहे. तत्पूर्वी अभ्यास समितीने महत्वाची माहिती मागविली आहे.

जुनी पेन्शन योजना अभ्यास समितीने मागितली सविस्तर माहिती

शालेय शिक्षण विभागांतर्गत मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये दि. ३१/१०/२००५ पूर्वी नियुक्ती झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिनांक ०१/११/२०१० पर्यंत शासनाकडून २०% अनुदान प्राप्त झाले असल्यास, सदर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांना विहीत शासन निर्णय/ नियमानुसार जुनी निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली यापैकी कोणती निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात येते. याबाबतची सविस्तर माहिती सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

मोठी अपडेट - महागाई भत्यात 3% वाढीसह पगारात होणार 'इतकी' वाढ!

तसेच शालेय शिक्षण विभागांतर्गत मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये दि. ३१ ऑक्टोबर २००५ पूर्वी नियुक्ती झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दि. ३१ ऑक्टोबर २०१० पर्यंत पहिला शासकीय अनुदानाचा हप्ता प्राप्त झाला नसल्यास, त्याचप्रमाणे २०११, २०१२ व २०१३ पर्यंतही सदर शासकीय अनुदानाचा हप्ता प्राप्त झाला नसल्यास सदर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विहीत शासन निर्णय/ नियमानुसार जुनी निवृत्तीवेतन योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली यापैकी कोणती निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात येते. याबाबतची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे.

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचारी न्यूज येथे वाचा - सरकारी कर्मचारी बातम्या - आरोग्य मेगा भरती सुरु, जाहिरात येथे 

त्याचबरोबर शालेय शिक्षण विभागांतर्गत मान्यता प्राप्त खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये दि. दि. ३१ ऑक्टोबर २००५ पूर्वी नियुक्ती झालेल्या आणि दिनांक १ नोव्हेंबर २०१० मध्ये शासनाकडून अनुदानाचा हप्ता प्राप्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची वर्षनिहाय संख्या, त्यांना लागू करण्यात आलेली निवृत्तीवेतन योजना (जुनी निवृत्तीवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना) यांची माहिती सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लवकरच जुनी पेन्शन योजनेसंदर्भात सरकार काय निर्णय घेते? हे पहावे लागेल.
परिपत्रक येथे पहा

$ads={2}

हे ही वाचा : कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम, GR पहा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढीव मोबदला GR पहा 

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post