NHM : राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय! राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना वाढीव मोबदला मिळणार

National Health Mission Employees : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना वाढीव मोबदला दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी मंजूर करण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना दिलासा मोठा मिळाला आहे.

$ads={1}

राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना वाढीव मोबदला

National Health Mission Employees

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हया दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरीता त्यांना दिनांक १७ जुलै, २०२०, ०९ सप्टेंबर, २०२१ व दि.१० एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी रु.५०००/- व ६२००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण ५८ सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात रु. ३००००.०० लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून, एप्रिल २०२३ ते जून, २०२३ या ३ महिन्याचे रु.१२६९४.०० लक्ष इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. 

करार कर्मचाऱ्यांना सुधारित मानधन!

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात रू. ५०७७७.०२ लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले आहे. त्यानुषंगाने वित्त व नियोजन विभागाने पुढील ३ महिन्यांकरिता ( माहे जुलै ते सप्टेंबर २०२३ ) या कालावधीचे आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांचे मोबदला अदा करण्यासाठी रू १२४८८.०० लक्ष इतका निधी वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे. [शासन निर्णय]

मोठी बातमी! राज्यातील रोजंदारी कर्मचारी शासन सेवेत कायम! शासन निर्णय

$ads={2}

Previous Post Next Post