7th Pay Commission : गुड न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 45% पर्यंत पोहोचणार! 3% वाढीसह पगारात होणार 'इतकी' वाढ, जाणून घ्या सविस्तर...

7th Pay Commission : सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्यात वाढ होण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक All India Consumer Price Index (AICPI) ची आकडेवारी महत्वाची असते, या आकडेवारी नुसार सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात (DA) मध्ये वाढ करत असते, नुकतेच कामगार मंत्रालयाकडून जुलै महिन्याची CPI-IW आकडेवारी दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आली असून, सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात मोठी वाढ होऊ शकते, यासाठी पगारात कितीने वाढ होणार? महागाई भत्ता कितीने वाढणार? सविस्तर जाणून घेऊया..

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 45% पर्यंत पोहोचणार!

7th Pay Commission

आपणास माहिती असेल, सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार? हे AICPI इंडेक्सच्या आधारे ठरवले जाते. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक All India Consumer Price Index (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केली जाते. जुलै महिन्याची AICPI इंडेक्स दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने या संदर्भात सध्या कोणतीही घोषणा केले नसले तरीही, CPI-IW चे आकडे पाहता अशी आशा व्यक्त केली जात आहे की, केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय हा कामगार ब्युरोने जारी केलेल्या आकडेवारीनुसार म्हणजेच CPI-IW च्या आधारे केंद्र सरकार घेते. जुलै 2023 महिन्याची CPI-IW आकडेवारीनुसार CPI-IW 3.3 अंकांनी वाढून 139.7 वर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास, यात सुमारे 0.90 टक्के वाढ दिसून येत आहे.

महागाई भत्ता हा वर्षातून दोनवेळा वाढवण्यात येतो, या सहामाहीतील महागाई भत्ता वाढ ही सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना मिळू शकते, यानुसार आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्यात 3% वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजेच सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% प्रमाणे DA मिळत आहे, यामध्ये 3 टक्के वाढ म्हणजे एकूण 45 टक्के वाढ होऊ शकते.

3% वाढीसह पगारात होणार 'इतकी' वाढ

कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्यात 3% वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना एकूण 45 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लाभ मिळेल, तर समजा कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 18,000 रुपये आहे, तर सध्याच्या 42% प्रमाणे 7,560 रुपये मिळतात, यामध्ये 3% वाढ म्हणजे एकूण 45% प्रमाणे मूळ पगारात 8,100 रुपयांची वाढ होईल. याचा देशातील सुमारे 47.58 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69.76 लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.

बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन शासन निर्णय! पहा

हे ही वाचा : कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत कायम, GR पहा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाढीव मोबदला GR पहा - जुनी पेन्शन योजना महत्वाची अपडेट पहा - केंद्र सरकारचा मोठा निर्णय जुनी पेन्शन लागू होणार

Previous Post Next Post