Maha Teacher Recruitment 2023 : आनंदाची बातमी! राज्यातील शिक्षक भरतीला सुरूवात; स्व - प्रमाणपत्र तयार करण्याच्या उमेदवारांना सुचना

Maha Teacher Recruitment 2023 : राज्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा आता संपली असून, पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 23 हजार शिक्षकांची भरती होणार आहे, यासाठी आता उमेदवारांना स्व - प्रमाणपत्र तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी mahateacherrecruitment.org.in या वेबसाईटवर दिनांक १ सप्टेंबर २०२३ ते दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.  स्व प्रमाणपत्र ऑनलाईन  कसे तयार करावे? सविस्तर वाचा..

$ads={1}

शिक्षक भरती स्व - प्रमाणपत्र तयार करण्याच्या उमेदवारांना सुचना

mahateacherrecruitment

राज्यातील शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल (Pavitra Portal) द्वारे करण्यात येते, राज्यातील जिल्हा परिषदांची शिक्षक बिंदूनामावली अंतिम झाली असून आता पवित्र पोर्टल लवकरच सुरू झाले आहे. पवित्र पोर्टल वर नोंदणी  Pavitra Portal Online Registration करण्यापूर्वी आता उमेदवारांना स्व प्रमाणपत्र तयार करावे लागणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी -२०२२ नुसार शिक्षक पदभरती करण्यासाठी उमेदवारांकडून स्व प्रमाणपत्र (Self-certification) पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले आहे. 

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ ही दिनांक २२/०२/२०२३ ते दिनांक ३/३/२०२३ या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती. सदर चाचणीस राज्यातून २ लाख ३९ हजार ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे. या चाचणी दिलेल्या उमेदवारांना स्व प्रमाणपत्र (Self-certification) तयार करण्यासाठी https://mahateacherrecruitment.org.in/ या पोर्टलद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

उमेदवारांना स्व प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक १ सप्टेंबर २०२३ ते दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. स्व-प्रमाणपत्र करण्यासाठी अडचण आल्यास edupavitra2022@gmail.com या इमेल वर संपर्क साधता येईल. असे कळविण्यात आले आहे.

मोठी अपडेट - महागाई भत्यात 3% वाढीसह पगारात होणार 'इतकी' वाढ!

शिक्षक भरती स्व प्रमाणपत्र असे करा तयार

  1. सर्वप्रथम https://mahateacherrecruitment.org.in/ या अधिकृत वेबसाईटवर जा. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे)
  2. तिथे Pavitra – Teachers Recruitment 2022 या पर्यायावर क्लिक करा
  3. आता Register Here या पर्यायावर क्लिक करा
  4. TAIT Roll Number आणि TAIT Registration Number टाकून Check TAIT यावर क्लिक करा
  5. त्यांनतर आवश्यक माहिती भरून, Create Password तयार करा
  6. आता पुन्हा Login पेज वरून लॉगीन करा
  7. Personal Details, Address Details, Category And Reservation Details, Academic Qualification Details, Professional Qualification Details, Other Academic Qualification (if Applicable) इत्यादी आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरून चेक करा
  8. त्यांनतर State Tet (mahatet) Details, Central Tet (ctet) Details चेक करा
  9. आता Self Certify Application Form भरून सबमिट करा आणि Download Self Certification Copy जतन करून ठेवा. [अधिक माहिती येथे पहा]
$ads={2}

शिक्षक भरती स्व - प्रमाणपत्र येथे तयार करा - डायरेक्ट लिंक
शिक्षक भरती पवित्र पोर्टल वेबसाईट - https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra/users/login?link=5/

Previous Post Next Post