Maharashtra Waqf Board Recruitment 2023 : इयत्ता 10 वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी! महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या विविध पदांसाठी येथे अर्ज करा

Maharashtra Waqf Board Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आता अजून एक जाहिरात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातर्फे देण्यात आली आहे, यामध्ये तुम्ही जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता व विधि सहायक या पदासाठी अर्ज करू शकता, त्यापूर्वी सविस्तर या पदाची पात्रता, वेतन, ऑनलाईन अर्ज कोठे करावा? अशी सविस्तर माहिती पाहूया..

$ads={1}

Maharashtra Waqf Board Recruitment 2023

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदे सरळसेवेने भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. तुम्ही नक्कीच या संधीचा लाभ घेऊ शकता.

पदाचे नाव व वेतनश्रेणी

 1. जिल्हा वक्फ अधिकारी - वेतनश्रेणी रु. ९३००-३४८०० + ग्रेड पे ४२०० 
 2. कनिष्ठ लिपिक - वेतनश्रेणी रु.५२००-२०२०० + ग्रेड पे १९००
 3. लघुटंकलेखक - वेतनश्रेणी रु. ९३००-३४८०० + ग्रेड पे ४३००
 4. कनिष्ठ अभियंता - वेतनश्रेणी रु.९३००-३४८०० + ग्रेड पे ४३००
 5. विधि सहायक - वेतनश्रेणी रु. ९३००-३४८०० + ग्रेड पे ४२००

सर्व पदांसाठी महागाईभत्ता, घरभाडे भत्ता, इत्यादी लाभ मिळणार आहे. वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार असणार आहे.

वयोमर्यादा- अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय दि. १ जुलै २०२३ या तारखेस गणण्यात येईल. सर्व पदांसाठी किमान वय १८ वर्ष असावे व कमाल ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

निवडीची पध्दत

 1. सर्व पदांसाठी मुख्यत्वे मराठी तसेच इंग्रजी या दोन्ही माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येणार आहे.
 2. संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत येण्यासाठी उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.

आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता

 1. जिल्हा वक्फ अधिकारी/ अधिक्षक - सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी.
 2. कनिष्ठ लिपिक - सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील (किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण) पदवी. 
 3. टायपिंग :- मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
 4. लघुटंकलेखक - किमान माध्यमिक (१० वी) शालांत परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
 5. टायपिंग :- १०० शब्द प्रति मिनिट यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी किंवा इंग्रजी लघुलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आणि मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
 6. कनिष्ठ अभियंता - सांविधिक विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका / पदवी/ पदव्युत्तर पदवी.
 7. विधि सहायक - सांविधिक विद्यापीठाची विधी (Law) शाखेतील पदवी.

महत्वाचे - अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचूनच अर्ज करावे.

अर्ज करण्याची पध्दत

ऑनलाईन अर्ज https://mdd.maharashtra.gov.in https://mahawakf.com आणि https://mahawaqf.maharashtra.gov.in या संकेतस्थळाद्वारे दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून दिनांक ०४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. तसेच जाहिरातीत ठरवून दिलेले परीक्षा शुल्क देखील भरणे आवश्यक आहे.

तलाठी भरती अपडेट लगेच पहा - डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post