Contract Employees News : राज्यातील 51 कंत्राटी कर्मचारी शासनसेवेत नियमित, सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार वेतनश्रेणी

Contract Employees In Government Service : राज्यातील मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत ठोक मानधनावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे, यामध्ये संगणक चालक पदावरील एकूण 51 कर्मचाऱ्यांची सेवा आता नियमित करण्यात आले असून, त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार S6-19900-63200 प्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे.

राज्यातील 51 रोजंदारी कर्मचारी शासनसेवेत नियमित

Contract Employees In Government Service

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर कंत्राटी पद्धतीने 'संगणक चालक' पदावर हे कर्मचारी सन 2007 पासून कार्यरत होते. महाराष्ट्र राज्यातील इतर काही महानगरपालिकेमधील रोजंदारी वरील कर्मचाऱ्यांची सेवा कायमस्वरूपी करून त्यांचे समायोजन करण्यात आले असल्याने, त्याच धर्तीवर आता मीरा भाईंदर महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा निर्णय शासनाने दिनांक 16 जून 2023 रोजी शासन निर्णय जारी केला आहे.

राज्यातील कंत्राटी कर्मचारी शासनसेवेत नियमित, शासन आदेश पहा

या निर्णयाअंतर्गत सदर महानगरपालिकेमध्ये एकूण 63 संगणक चालक कर्मचारी कार्यरत होते, त्यापैकी 51 संगणक चालक कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात आले. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही शासनाने विहित केलेल्या प्रक्रिया नुसार (जाहिरात, लेखी परीक्षा व मुलाखत) पद्धतीने पार पडलेली असल्याने त्यांना कायमस्वरूपी शासन सेवेत सामावून घेण्यात आले आहेत.

मात्र इतर 12 कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही शासनाने विहित केलेल्या प्रक्रियेनुसार न पार पडता असल्याने केली असल्याने, हे कर्मचारी सामान्य प्रशासन विभागाच्या 25 ऑगस्ट 2005 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भातील आदेश विचारात घेता पात्र ठरत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारात दरवर्षी 3% वाढ मंजूर

सविस्तर वाचा - तलाठी भरती हॉल तिकीट बाबत लेटेस्ट अपडेट पहा

सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार वेतनश्रेणी

'संगणक चालक' हे पद मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आकृतीबंधात मंजूर नसल्याने, शासनाने असा निर्णय घेतला आहे की, 51 कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करत असताना, तेवढी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना सातव्या वेतन आयोगानुसार S6-19900 ते 63200 ही वेतनश्रेणी लागू करून, कायमस्वरूपी शासन सेवेत नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. [सुधारित वेतनश्रेणी अधिक वाचा..]

सदर कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे ही सेवा निवृत्तीनंतर अथवा इतर कारणास्तव रिक्त झाल्यास ते आपोआप व्यापकत होणार आहे. [शासन निर्णय पहा]

कंत्राटी भरतीचा तो शासन निर्णय अखेर रद्द! आता नऊ महिन्याच्या आत या कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात येणार


$ads={2}

शिक्षक भरतीच्या प्रक्रियेतील नवीन अपडेट

मोठी बातमी! कंत्राटी कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यासाठी धोरणात्मक निर्णय! महत्वाची बैठक संपन्न

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Please do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)
Previous Post Next Post