Talathi Bharti Hall Ticket 2023 : Mahabhulekh Talathi Bharti Login Hall Ticket Download Direct Link....

Talathi Bharti Hall Ticket Download Direct Link 2023 : तलाठी भरती परीक्षेचे (Talathi Exam Shift Timings) वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले असून, दिनांक 17 ऑगस्ट 2023 पासून तलाठी परीक्षा सुरु झाली आहे, ऑनलाईन अर्ज केलेल्या तलाठी परीक्षेचे (Talathi Bharti) Hall Ticket प्रवेशपत्राबाबत एक महत्वाची जाहीर सूचना कळविण्यात आली आहे.

$ads={1}

Mahabhulekh Talathi Bharti Login Hall Ticket Download Direct Link

महसूल विभागातील गट- क (Group-C) संवर्गातील तलाठी भरती सन 2023 ही TCS कंपनीमार्फत घेण्यात येत आहे. राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील होत असलेल्या सर्वात मोठी तलाठी भरतीसाठी राज्यातून 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी तलाठी भरती साठी अर्ज केला आहे. (जिल्हानिहाय ऑनलाईन अर्ज आकडेवारी येथे पहा)

तलाठी भरतीसाठी प्रवेशपत्रे (Hall Ticket) जाहीर

तलाठी भरती परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) या दिवशी उपलब्ध होणार (Talathi Bharti Hall Ticket) : तलाठी परीक्षेकरीता TCS कंपनीमार्फत होत असून, सदरची परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात 3 सत्रामध्ये 19 दिवस होणार आहे. मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी यांची संख्या असल्याने तसेच Cyber Security ची खबरदारी म्हणून तसेच ऑनलाईन गैरप्रकार, अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

ज्यांना हॉल तिकीट मिळाले नाही त्यांच्यासाठी महत्त्वाचे

वरील कारणाने परीक्षेच्या तारखेच्या 3 दिवस आधी प्रवेशपत्र (Talathi Hall Ticket) प्रत्येक परीक्षार्थी यांच्या Login Id वर उपलब्ध केले जाईल याची कृपया नोंद घ्यावी. असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

हे ही वाचा - कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा - सण अग्रिम या तारखेला मिळणार लगेच पहा - 

सदर परिक्षा दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि.१४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असणार आहे. सदर परिक्षा ३ सत्रात आयोजित करणेत आलेली आहे. 

तलाठी भरती परीक्षेची वेळ - Talathi Exam Shift Timings

  1. सत्र १ ले - सकाळी ९.०० ते ११.०० 
  2. सत्र २ रे - दुपारी १२.३० ते २.३०
  3. सत्र ३ रे - सायंकाळी - ४.३० ते ६.३०

महत्वाचे - तलाठी भरती हॉल तिकीट - MH Talathi Exam Hall Ticket Link 

तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना हॉल तिकीट हे त्यांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व युजर आयडी याबाबत संपर्कात राहावे. असे भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

तलाठी भरती हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक
तलाठी भरतीसाठी 10 लाखांहून अधिक अर्ज! - जिल्हानिहाय आकडेवारी पहा

अधिकृत वेबसाईट - https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

Talathi Bharti Hall Ticket 2023 : Mahabhulekh Talathi Bharti Login Hall Ticket Download Direct Link...

Previous Post Next Post