Talathi Bharti : महाराष्ट्रातील तलाठी भरतीसाठी 10 लाखांहून अधिक अर्ज! तलाठी भरतीसाठी प्रवेशपत्रे (Hall Ticket) जाहीर, महत्वाची जाहीर सूचना..

Talathi Bharti Hall Ticket Latest News : राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील होत असलेल्या सर्वात मोठी तलाठी भरतीसाठी राज्यातून 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी तलाठी भरती साठी अर्ज केला आहे, तलाठी भरती परीक्षेचे (Talathi Exam Shift Timings) वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले असून, आता तलाठी परीक्षेच्या प्रवेशपत्राबाबत एक महत्वाची जाहीर सूचना कळविण्यात आली आहे.

$ads={1}

MH Talathi Exam Hall Ticket Link

MH Talathi Exam Hall Ticket Link : परीक्षेचा फॉर्म भरून देखील बऱ्याच उमेदवारांना परीक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) वेळेत उपलब्ध होत नाही किंवा बऱ्याचदा परीक्षा संपल्यानंतर उमेदवारांना माहित होते, अशा काही घटना मागील वन विभागाच्या परीक्षेदरम्यान घडल्या आहेत. मात्र आता तलाठी भरतीचा अर्ज केलेल्या उमेदवारांनी काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घेऊन अपडेट राहणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील तलाठी भरतीसाठी 10 लाखांहून अधिक अर्ज!

महसूल विभागातील गट- क (Group-C) संवर्गातील तलाठी भरती सन 2023 ही TCS कंपनीमार्फत घेण्यात येत आहे. सदरच्या तलाठी परीक्षेकरीता राज्यभरातून 10 लाख 41 हजार 713 उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहे.

राज्यात सर्वाधिक अर्ज हे पुणे जिल्ह्यात 1 लाख 14 हजार 684 तर रायगड जिल्ह्यात 1 लाख 537 उमेदवारांनी अर्ज केले आहे. तर सर्वात कमी अर्ज हे वाशीम जिल्ह्यात 2 हजार 636 अर्ज प्राप्त झाले आहे. [जिल्हानिहाय ऑनलाईन अर्ज आकडेवारी येथे पहा]

तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर - Talathi Exam Shift Timings

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (Group-C) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात दि. २६ जून २०२३ रोजी प्रसिध्द करणेत आलेली आहे. सदर तलाठी भरती परीक्षेकरिता TCS कंपनीकडून तारखा (Talathi Exam Shift Timings) निश्चित करणेत आलेल्या आहेत. सदर परिक्षा दि.१७ ऑगस्ट २०२३ ते दि.१४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत १९ दिवस असणार आहे. सदर परिक्षा ३ सत्रात आयोजित करणेत आलेली आहे. 

तलाठी उमेदवार लवकरच नियुक्त होणार! महत्वाचे शासन परिपत्रक पहा

तलाठी भरती परीक्षेची वेळ - Talathi Exam Shift Timings

  1. सत्र १ ले - सकाळी ९.०० ते ११.०० 
  2. सत्र २ रे - दुपारी १२.३० ते २.३०
  3. सत्र ३ रे - सायंकाळी - ४.३० ते ६.३०

तलाठी भरतीसाठी प्रवेशपत्रे (Hall Ticket) जाहीर

तलाठी भरती परिक्षेचे प्रवेश पत्र (Hall Ticket) या दिवशी उपलब्ध होणार (Talathi Bharti Hall Ticket) : तलाठी परीक्षेकरीता TCS कंपनीमार्फत होत असून, सदरची परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात 3 सत्रामध्ये 19 दिवस होणार आहे. मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी यांची संख्या असल्याने तसेच Cyber Security ची खबरदारी म्हणून तसेच ऑनलाईन गैरप्रकार, अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कारणाने परीक्षेच्या तारखेच्या 3 दिवस आधी प्रवेशपत्र (Talathi Hall Ticket) प्रत्येक परीक्षार्थी यांच्या Login Id वर उपलब्ध केले जाईल याची कृपया नोंद घ्यावी. असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

सरकारी नोकर भरती : पनवेल महानगरपालिकेत मोठी भरती सुरु - MIDC मध्ये 802 जागांसाठी जम्बो भरती - दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरी - राज्यात कृषी सेवकांच्या 952 जागांसाठी बंपर भरती - पनवेल महानगरपालिकेत मोठी भरती सुरु

तलाठी भरती हॉल तिकीट - MH Talathi Exam Hall Ticket Link 

तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना हॉल तिकीट हे त्यांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी त्यांचे ईमेल व युजर आयडी याबाबत संपर्कात राहावे. असे भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.


तलाठी भरती हॉल तिकीट येथे डाउनलोड करा - डायरेक्ट लिंक
हॉल तिकीट जाहीर सूचना पहा
तलाठी भरतीसाठी 10 लाखांहून अधिक अर्ज! - जिल्हानिहाय आकडेवारी पहा

Previous Post Next Post