पनवेल महानगरपालिकेत 377 जागांसाठी मोठी भरती! ऑनलाईन अर्ज येथे करा

Panvel Municipal Corporation Recruitment : पनवेल महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट 'अ' ते गट 'ड' मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण 377 पदांकरिता अर्ज मागविण्यात आले आहे. दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवारांनी https://www.panvelcorporation.com/ या संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

$ads={1}

Panvel Municipal Corporation Recruitment

प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधी, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यान सेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रिडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशु वैद्यकीय सेवा, लेखापरिक्षण सेवा, इत्यादी सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. 

या भरतीसाठी गट 'अ' ते गट 'ड' मधील एकूण 377 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक १३/०७/२०२३ पासून ते दिनांक २७/०८/२०२३ रोजी पर्यंत देण्यात आला होता, मात्र आता मुदतवाढ देण्यात आली असून, दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवारांनी https://www.panvelcorporation.com/ या संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

हे ही वाचा - अस्थायी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा - जुनी पेन्शन योजना लेटेस्ट बातमी

महत्वाच्या तारखा

  1. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु - दिनांक १३/०७/२०२३
  2. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा - अंतिम दिनांक १७/०८/२०२३
  3. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक - परीक्षेच्या ०७ दिवस आधी
  4. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक - पनवेल महानगरपालिकेच्या https://www.panvelcorporation.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशिल व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील संकेत स्थळावर भेट देण्यात यावी. तसेच संर्वर्गनिहाय भरावयाची पदे पदांचा तपशिल, वेतनश्रेणी. वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशिल मूळ जाहिरातीत सविस्तरपणे पहावे.

पनवेल महानगरपालिका मूळ जाहिरात येथे डाउनलोड करा
पनवेल महानगरपालिका भरती ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post