दिलासादायक बातमी! अस्थायी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा; राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय!

Extension Of Temporary Posts : राज्यातील अस्थायी स्वरुपात नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अस्थायी पदांना पुढे चालू ठेवण्यास शासनाने महत्वाचा निर्णय घेतला असून, आता यापुढे सुधारीत आकृतीबंध शासन मान्यतेकरीता तात्काळ सादर करण्याचे सूचना केल्या आहेत, याबाबतचा शासन आदेश दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी जारी केला आहे.

$ads={1}

Extension Of Temporary Posts

राज्यातील पुणे व सोलापूर जिल्ह्यांतर्गत ग्रामीण रुग्णालयातील विविध आरोग्य संस्थांमधील अस्थायी पदांची मुदत ही 28 फेब्रुवारी 2023 रोजी संपुष्टात आली होती. यासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्तालयाने उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ, पुणे यांच्या अधिपत्याखालील पुणे व सोलापूर जिल्ह्यामधील ग्रामीण रुग्णालयातील 102 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला होता.

त्यानुसार अखेर शासनाने पुणे व सोलापूर जिल्ह्यामधील ग्रामीण रुग्णालयातील 102 अस्थायी पदांना दि.01/03/2023 ते दि.31/08/2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

मोठी बातमी ! कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारचे मोठे गिफ्ट!
सविस्तर वाचा - तलाठी भरती हॉल तिकीट बाबत लेटेस्ट अपडेट पहा

तसेच आयुक्तालय, आरोग्य सेवा, मुंबई यांनी सर्व पदांचा आढावा घेऊन सुधारीत आकृतीबंध शासन मान्यतेकरीता तात्काळ सादर करावा. यानंतर सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्याकरीता वारंवार कालावधी वाढवून मिळणार नाही, याची नोंद घ्यावी. असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अस्थायी पदांना मुदतवाढ शासन निर्णय पहा

Previous Post Next Post