गुड न्यूज! राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ; सुधारित मानधन पहा..

Contractual Employees Latest News : राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगारामध्ये वाढ करण्याचा शासन आदेश दिनांक ११ ऑगस्ट २०२३ रोजी ग्राम विकास विभागाने जारी केला आहे, यामध्ये राज्यस्तर ते तालुकास्तरावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सुधारित मानधन बाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

Contractual Employees Latest News

राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयासाठी तसेच विभागस्तर, जिल्हास्तर, व तालुकास्तर या क्षेत्रीय स्तरावर विविध पदावर' कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहे.

सद्य:स्थितीत केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणसह अन्य राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांची राज्यात अभियान स्वरुपात अंमलबजावणी सुरू असून, महा आवास अभियान - ग्रामीण सारखे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. यास्तव, राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृहनिर्माण कक्षाअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी/ बाह्ययंत्रणेद्वारे कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या मानधनाच्या दरांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. ही सर्व वस्तुस्थिती विचारांत घेता, या कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ - सुधारित मानधन पहा

राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयांतर्गत तसेच क्षेत्रीय स्तरावरील कंत्राटी - स्वरूपाच्या पदांवर नियुक्त कर्मचाऱ्यांचे मानधन पुढीलप्रमाणे

पदाचे नाव - सध्याचे मानधन - सुधारित मानधन

 1. बँकिंग तज्ञ - ६०,००० - ६३,०००
 2. वास्तुरचनाकार / सल्लागार - ६०,००० - ६३,०००
 3. कार्यकारी अभियंता - ६०,००० - ६३,०००
 4. प्रशिक्षण समन्वयक - ५०,००० - ५२,५००
 5. राज्य समन्वयक (MIS) - ५०,००० - ५२,५००
 6. कनिष्ठ अभियंता - ४५,००० - ४७,२५०
 7. लेखा सहायक - ३२,००० - ३३,६००
 8. लघुटंकलेखक - २६,००० - २७,३००
 9. डेटा एन्ट्री ऑपरेटर (राज्यस्तर) - २५,००० - २६,२५०
 10. शिपाई - १८,००० - १८,९००
 11. राज्य समन्वयक (IT) - ७७,००० - ८०,८५०
 12. राज्य समन्वयक (M&E) - ७७,००० - ८०,८५०
 13. राज्य समन्वयक (योजना) - ४१,००० - ४३,०५०
 14. विभागीय प्रोग्रामर - २८,००० - २९,४००
 15. जिल्हा प्रोग्रामर - २६,००० - २७,३००
 16. डेटा एन्ट्री ऑपरेटर (जिल्हास्तर) - २२,००० - २३,१००
 17. डेटा एन्ट्री ऑपरेटर (तालुकास्तर) - २२,००० - २३,१००
$ads={2}

 

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post