मोठी अपडेट! राज्यातील 23 हजार 369 उमेदवारांचे तलाठी परीक्षा शुल्क परत! इतर उमेदवारांसाठी महत्वाचे परिपत्रक...

Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023: महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती बाबतची जाहिरात दि. २६ जून २०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर परिक्षेकरिता एकुण १०,४९,७१३ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. काही उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करताना दोन किंवा अधिक वेळा परिक्षा शुल्क जमा करणेत आलेले आहे. दुबार परिक्षा शुल्क जमा केलेल्या उमेदवारांपेकी २३,३७९ उमेदवारांचे परिक्षा शुल्क हे परत करण्यात आलेले आहे. मात्र ज्यांचे परीक्षा शुल्क मिळाले नाही त्यांनी तात्काळ माहितीचा मेल करावयचा आहे. तसेच तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक दिलेली आहे.

$ads={1}

परंतू १,२१९ उमेदवार यांचे नाव व बँक खात्यावरील नाव हे विसंगत होत असल्याने अद्यापपर्यंत त्यांचे दुबार झालेले परिक्षा शुल्क उमेदवारांना परत करता आलेले नाही. त्यामुळे आता ज्या उमेदवारांना दुबार परिक्षा शुल्क मिळाले नाही त्यांनी महाभूमी कडून दिलेल्या talathi.recruitment2023@gmail.com या अधिकृत Email आयडी वर खालील माहितीचा मेल करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. यासाठी यादीतील उमेदवारांनी सदरच्या ई- मेल आयडीवर तात्काळ माहिती पाठवावी, जेणेकरून दुबार परीक्षा शुल्क परत मिळू शकेल.

माहितीचा तपशील खालीलप्रमाणे मेल वर पाठवायचा आहे. यासाठी खाली दिलेल्या लिंक वर यादीत तुमचे नाव असेल तर तुम्ही तात्काळ सदरच्या मेलवर खालील माहिती पाठवावी.

 1. उमेदवारांचे नाव 
 2. बँकेचे नाव 
 3. बँक खाते क्र.
 4. बँकेचा IFSC Code
 5. रजिस्ट्रेशन नं. (तलाठी अर्ज नोंदणी क्रमांक)
 6. मोबाईल नं.
 7. ई-मेल आयडी
Talathi Bharti 2023

$ads={2}

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

तलाठी भरती परीक्षा दिलेल्या उमेदवारांना तलाठी भरती निकाल 2023 जाहीर होण्याची उत्सुकता लागली असून, Talathi Bharti Cut Off 2023 किती पर्यंत जाईल याबाबत आतुरता आहे, मागील निकालानुसार राज्यातील 36 जिल्ह्यांचा निकाल डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता.

राज्यातील तलाठी भरती यापूर्वी झालेल्या 2019 मध्ये तलाठी भरती परीक्षेचा कट ऑफ हा खालीलप्रमाणे लागलेला दिसून आलेला आहे. संवर्गनिहाय (Category) नुसार कट ऑफ पुढीलप्रमाणे 

संवर्ग (Category) - तलाठी भरती परीक्षा कट ऑफ (Maharashtra Talathi Cut Off)

 • General - 172-180
 • OBC - 170-176
 • EWS - 168-176
 • SC - 160-168
 • ST - 150-162
 • VJ - 160-168
 • NT - 160-168

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

Previous Post Next Post