MSRLM : राज्यातील कंत्राटी संसाधन व्यक्तीच्या मानधनात भरीव वाढ! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

MSRLM Contract Employees Salary Increase: उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी 1076 कोटींची वाढीव तरतूद करण्याचा निर्णय 16 सप्टेंबर रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. स्वयं सहायता समूहांसाठी फिरत्या निधीत तसेच (Community Resource Persons) समुदाय संसाधन व्यक्तींच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. त्याच बरोबर समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये 1 लाख 24 हजार गटांना रुपये 248.12 कोटी वितरीत करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील 12 लक्ष 45 हजार  महिलांना आणि मराठवाड्यातील 8 हजार 833 समुदाय संसाधन व्यक्तींनात्याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.

$ads={1}

राज्यातील कंत्राटी संसाधन व्यक्तीच्या मानधनात भरीव वाढ! 

MSRLM Contract Employees Salary Increase

स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणा-या 15 हजार रुपये फिरता निधीमध्ये वाढ करुन ती रक्कम 30 हजार रुपये करण्यात आली आहे. सर्व स्वयंसहाय्यता गटांसाठी रुपये 913 कोटी खेळते भांडवल म्हणून राज्य शासनाकडून देण्यात येतील.

महाराष्ट्रामध्ये एकूण 6 लाख 8 हजार  स्वयंसहाय्यता गटांची स्थापना करून साधारण 60 लाखापेक्षा जास्त महिलांना या कार्यक्रमात सामावून घेतलेले आहे. यापैकी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये 1 लाख 24 हजार स्वयंसहाय्यता गटांमध्ये साधारणपणे 12 लाख 23 हजार  महिलांचा समावेश आहे. 

अभियानांतर्गत गटांना सुरवातीच्या टप्प्यात दिले जाणारे खेळते भांडवल केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्रातील 3 लाख 88 हजार  गटांना  रुपये 582 कोटी  वितरीत केलेले आहेत, त्यापैकी मराठवाड्यामध्ये 83 हजार 593 गटांना रुपये 125 कोटी रकमेचे वितरण करण्यात आलेले आहे. यामध्ये अधिकचे खेळते भांडवल महिलांना उपलब्ध होऊन जास्तीत जास्त रोजगार व स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे.

त्याचप्रमाणे समुदाय संसाधन व्यक्तींना दरमहा देण्यात येणारे 3 हजार रुपये मासिक मानधनात वाढ करुन दरमहा 6 हजार रुपये मासिक मानधन करण्यात आलेले आहे. यासाठी राज्य शासनाने वाढीव 163 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

राज्यातील समग्र शिक्षा मधील कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ निर्णय पहा

Previous Post Next Post