Cabinet Meeting Decision News : कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Cabinet Meeting Decision News : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ सप्टेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक स्मार्ट सिटी सभागृहात संपन्न झाली, तब्बल ७ वर्षांनी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्याचे मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक (Cabinet meeting) संपन्न झाली, तसेच मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह सर्वच मंत्री या बैठकीत सहभागी होते. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या (Contract Employee) मानधनात मोठी वाढीचा प्रलंबित निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत  घेण्यात आला.

$ads={1}

समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ

contract-employee-cabinet-meeting-decision-news

यावर्षीच्या 'समग्र शिक्षा' बजेटमध्ये राज्यातील समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना मानधन वाढ होईल ही अपेक्षा होती, मात्र केंद्र सरकारने मंजूर केलेल्या PAB मिनिट्स (PAB Minutes) नुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात कसलीही वाढ करण्यात आलेली नाही. गेल्या ५ वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांकडून मानधनात वाढ करण्याची मागणी वारंवार होत होती. त्यानुसार १६ सप्टेंबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत समग्र शिक्षा मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला.

समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमातंर्गत करार पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय 16 सप्टेंबर रोजीच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्य स्तरावरील कार्यालयात ६४ व जिल्हा स्तरावरील कार्यालयात ६१८७ असे एकूण ६२५१ कर्मचारी यांना याचा लाभ मिळणार आहे. अतिरिक्त निधी राज्य शासनाच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कर्मचा-यांच्या मानधनापोटी २२९ कोटी ५६ लाख एवढा वार्षिक खर्च येतो. मानधनात १० टक्के वाढ केल्यामुळे २५२ कोटी ५२ लाख इतका खर्च येणार आहे.

मंत्रिमंडळनिर्णय खालीलप्रमाणे

  1. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. १३ हजार ६७७ कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर .
  2. अंबाजोगाई तालुक्यात लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन करणार
  3. छत्रपती संभाजीनगरला फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना
  4. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद. मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ.
  5. हिंगोली येथे नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय. ४८५ कोटी खर्चास मान्यता
  6. राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना ८५ हजार रुपये दरमहा मानधन. १२.८५ कोटी खर्च
  7. सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार
  8. समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ.
  9. राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय.
  10. सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय
  11. परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
  12. परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय
  13. परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार
  14. सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय
  15. नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
  16. धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा
  17. जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापणार. १० कोटीस मान्यता
  18. गोर (बंजारा) समाज भवनासाठी नवी मुंबई येथे भूखंड देणार
  19. राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान राबविणार
  20. २००५ पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि २००९ मध्ये नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ

$ads={2}
Previous Post Next Post