छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र दृष्टिबाधितांसाठी ब्रेल लिपीत; सरकारचा महत्त्वाचा निर्णय!

Biography of Chhatrapati Shivaji Maharaj in Braille for Blind: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी शके १५९५ अर्थात दिनांक ६ जून, १६७४ या दिवशी संपन्न झाला. त्यानुसार, ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी शके १९४५ अर्थात दिनांक २ जून, २०२३ पासून शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष सुरु झाले आहे. विभागामार्फत वर्षभर विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र दृष्टिबाधित (Blind) दिव्यांगाकरीता ब्रेल (Braille) लिपीमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. याबाबत सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र दृष्टिबाधितांसाठी ब्रेल लिपीत

Biography of Chhatrapati Shivaji Maharaj in Braille for Blind

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र दृष्टिबाधित दिव्यांगाकरीता ब्रेल लिपीमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या नियोजनासाठी खालीलप्रमाणे सनियंत्रण समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Biography of Chhatrapati Shivaji Maharaj in Braille for Blind

समितीची कार्यकक्षा

  1. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ब्रेल लिपीमध्ये साहित्य छपाई साठी पुस्तकांची निवड करणे.
  2. कारवाईबाबत कार्यकाळ व रुपरेषा ठरविणे.
  3. या प्रयोजनार्थ होणारा खर्च निश्चित करणे.
  4. छापलेल्या पुस्तकांचे वितरण करण्यासाठी संस्थेची निवड करणे.

समितीचा कार्यकाल

छत्रपती शिवाजी महाराज यांचे (Shivaji Maharaj's biography) चरित्र दृष्टिबाधित Visually Impaired दिव्यांगाकरीता ब्रेल लिपीमध्ये रुपांतरीत करण्यात आल्यानंतर आपोआप संपुष्टात येणार आहे. सदर समितीचा कमाल कालावधी हा ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची वर्षपूर्ती होईपर्यंत असणार आहे. त्यामुळे लवकरच दृष्टिबाधित व्यक्तींना छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र ब्रेल लिपीतून जाणून घेता येणार आहे.

मोठा निर्णय! दिव्यांगांसाठी महाराष्ट्रात स्वतंत्र आयटीआय

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post