ESIC: कर्मचारी राज्य विमा महामंडळाची रुग्णालये आता कामगार विभागाकडे; कामगार मंत्री डॉ. खाडे यांचे निर्देश

Employees State Insurance Corporation: कर्मचारी राज्य विमा महामंडळाची रुग्णालये (ESIC) ही इतर राज्यात कामगार विभागाकडून अतिशय उत्तम पद्धतीने संचालित केली जात आहेत. महाराष्ट्रातील रुग्णालये सुद्धा कामगार विभागाकडून संचलित करण्यासाठी ती कामगार विभागाकडे तत्काळ हस्तांतरित करावीत, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.

कर्मचारी राज्य विमा महामंडळाची रुग्णालये आता कामगार विभागाकडे; बदलाचा फायदा कोणाला?

Employees State Insurance Corporation

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र क्षेत्रातील प्रादेशिक मंडळाची ११४ वी बैठक 12 ऑक्टोबर रोजी मंत्रालयातील परिषद कक्षात कामगार मंत्री तथा ESIC राज्य अध्यक्ष डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, ई. एस.आय सी चे विभागीय संचालक तथा सदस्य सचिव अनील साहू, सदस्य संगीता जैन, रवींद्र झिमटे, वैद्यकीय आयुक्त डॉ. सी. सी. खाका, विमा आयुक्त तसेच सर्व वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.

राज्यात असलेली ESIC रुग्णालये ही सर्व आजारांचा उपचार करणारी, सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसारखी असावीत. तसेच त्यांना जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालये जोडून घ्यावीत. रुग्णालयातील डॉक्टरांच्या 156 रिक्त पदांचा प्रस्ताव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आलेला आहे. 

राज्य लोकसेवा आयोगाकडून परीक्षा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रुग्णालयासाठी अत्यावश्यक असणाऱ्या डॉक्टरांची सेवा कंत्राटी पद्धतीने घेण्यात यावी, असे श्री. खाडे यांनी सांगितले. तसेच जी रुग्णालये जोडलेली आहेत त्यांची देयके त्वरीत अदा करण्यात यावी. वैद्यकीय मंडळ पुनर्गठित करण्यासाठीचे नियम, अटी, शर्ती इत्यादी माहिती पुरविण्यात यावी. विचार विनिमय करून याबाबत निर्णय घेण्यात येईल.

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात 20% वाढ
जिल्हा परिषद भरती परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यातील वेळापत्रक, हॉल तिकीट जिल्हानिहाय येथे पहा

हिंगोली आणि नंदुरबार येथे कर्मचारी संख्या चांगली असल्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात दवाखाने सुरु करण्यासाठी शासनाकडून जागा मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. शासकीय जागा उपलब्ध नसल्यास इमारत भाड्याने घेऊन दवाखाने सुरु करावेत, असेही मंत्री डॉ. खाडे यांनी सांगितले.

कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! सेवेत नियमित आदेश जारी
दिवाळीपूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट!

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now