PMJJBY Details : फक्त 436 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणार 2 लाखांचा विमा, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स...

सर्वसामान्य कुटुंबाना सुरक्षितेची हमी देणारी केंद्र सरकारची Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Policy ही एक महत्वाची सरकारी योजना आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योति बिमा (PMJJBY) योजनेत फक्त 436 रुपये  इतक्या अत्यल्प वार्षिक हप्त्यामध्ये तुम्हाला हा विमा काढता येतो, यामध्ये लाभार्थ्याचे कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास वारसांना 200000 रुपये बिमा लाभ देण्यात येतो, या आर्टिकल मध्ये आपण PMJJBY Policy काढण्यासाठी आवश्यक पात्रता, ऑनलाईन अर्ज कोठे करावा?, लाभ , क्लेम इतर संपूर्ण Details सविस्तर पाहूया.

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना काय आहे? | PMJJBY Details

pmjjby details

प्रधानमंत्री बीमा योजना ही केंद्र शासनाची एक कुटुंबाना सुरक्षतेची हमी देणारी सरकारी योजना आहे. Pradhan Mantri Bima Yojana मध्ये नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयापर्यंत विमा संरक्षण देणारी ही योजना आहे. यामध्ये 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होवू शकतात. या योजनेत सहभागी झालेल्या विमा धारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास वारसाला 2 लाख रुपये इतकी भरपाई मिळते. प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजने अंतर्गत वार्षिक हप्ता 436 रुपये इतका प्रती व्यक्ती प्रती वर्षी आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचे फायदे | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Benefits

देशातील नागरिकांना अत्यल्प वार्षिक हप्ता भरून PMJJBY या बिमा योजनेचा लाभ घेता येतो. यामध्ये गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा हा Premium वार्षिक हप्ता भरू शकेल इतक्या कमी रकमेचा आणि विशेष म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने भरता येईल आणि क्लेम देखील सहजपणे करता येतो.

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PMJJBY) ही केंद्र सरकारची कुटुंबाना सुरक्षितेची हमी देणारी विमा योजना आहे.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेत वार्षिक फक्त 436 रुपये भरून हा विमा खरेदी करता येतो.
  • PMJJBY या विमा लाभार्थ्यांच्या कुटुंबाना 2 लाख रुपये विमा कवच प्रदान केले जाते.
  • प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँका, सर्व खासगी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांपैकी कोणत्याही बँकेत आपले बचत ठेव खाते असल्यास या योजनांचा लाभ घेता येतो. 
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा वार्षिक हप्ता भरल्यानंतर 45 दिवसानंतर हा विमा लागू होतो.
  • PMJJBY विमा योजनेतील लाभार्थ्यांचे कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास हा विमा लागू आहे.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा वार्षिक हप्ता दरवर्षी 31 मे पर्यंत भरता येतो, आणि 1 जून पासून ही विमा योजना लागू होते.
  • या विमा योजनेत स्वयंचलीत (Auto Debit) वार्षिक हप्ता भरण्याची सुविधा दिली जाते.

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना आवश्यक पात्रता

  • ज्या नागरिकांचे वय 18 ते 50 आहे असे सर्व व्यक्ती प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजनेत सहभागी होवू शकतात.
  • कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांपैकी कोणत्याही बँकेत बचत ठेव खाते (Savings Account) असणे आवश्यक आहे.
  • बँक अकाऊट ला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
  • बँक अकाऊंट सुरु असणे आवश्यक आहे.
  • दरवर्षी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना वार्षिक हप्ता भरणे आवश्यक आहे.

नवनविन अपडेट साठी  ग्रुप जॉईन करा

                         
Previous Post Next Post