मोठी बातमी ! गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील रक्कमेत केली मोठी वाढ, सुधारित योजना येथे पहा..

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2023 : राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार विविध प्रकारच्या योजना राबवीत असते, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठीची एक महत्वपूर्ण अपघात विमा (Accident Insurance) योजना ही राज्यामध्ये Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana या नावाने ओळखली जाते, आता ही योजना सुधारित करून महाराष्ट्र सरकारने योजनेस मान्यता दिली आहे, शेती करताना अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात होणे, रस्ते, वाहन अपघात तसेच इतर कारणामुळे मृत्यू किंवा अपंगत्व (दिव्यांग्त्व) आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या वारसांना आर्थिक लाभ देण्यासाठीची ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ संदर्भातील सविस्तर माहिती पाहूया..

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना काय आहे?

Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2023

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण राज्य शासनाची सरकारी योजना आहे. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. 

अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करुन संकटातून बाहेर काढत त्यांना मानसिक बळ देणारी योजना म्हणून ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ ओळखली जाते.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत 'या' अपघाताचा होतो समावेश

शेती व्यवसाय करत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्ते, वाहन अपघात आदी कारणामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 

रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यामध्ये बुडून मृत्यू, जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीजपडून झालेला मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलाईटकडून झालेली हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी अथवा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, अन्य कोणतेही अपघात या अपघातांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य 

 1. अपघाती मृत्यू, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास अशावेळी 2 लाख रुपये 
 2. अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (अपंगत्व)

योजनेअंतर्गत आवश्यक पात्रता

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील आवश्यक पात्रता आवश्यक आहे.
राज्यातील सर्व वहिती धारक खातेदार शेतकरी व वहिती धारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पत्नी/पती, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वर्ष वयोगटातील एकूण 2 सदस्याचा समावेश करण्यात आला आहे.

आवश्यक कागदपत्रे

 • क्लेम फॉर्म भाग – 1 व सहपत्र
 • क्लेम फॉर्म भाग – 2 (अ) व (ब)
 • क्लेम फॉर्म भाग – 3
 • सातबारा उतारा 6 – क (वारस नोंद उतारा)
 • 6 – ड (फेरफार उतारा)
 • आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र 
 • वयाचा पुरावा (स्वयंसाक्षांकित प्रत) 
 • शिधापत्रिका (स्वयंसाक्षांकित प्रत) 
 • मृत्यु दाखला / अपंगत्वाचा दाखला (स्वयंसाक्षांकित प्रत) 
 • प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) (स्वयं साक्षांकित प्रत) 
 • घटनास्थळ पंचनामा (स्वयंसाक्षांकित प्रत)
 • पोलिस पाटील माहिती अहवाल (एफआयआर नसल्यास) 
 • इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल 
 • व्हिसेरा अहवाल (आवश्यक असल्यास)
 • वाहन परवाना (आवश्यक असल्यास)
 • बँक पासबुक (झेरॉक्स प्रत)
 • अपंगत्वाच्या टक्केवारीचे प्रमाणपत्र 
 • फोटो, नावात / आडनावात बदल असल्यास प्रतिज्ञापत्र

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा अर्ज येथे करा

संबंधित अपघातग्रस्त शेतकरी/ शेतकऱ्यांचे वारसदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे अपघाताचे प्रकरण निदर्शनास आल्यापासून 30 दिवसाच्या म्हणजेच एक महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासाठी कृषि विभागाचे संबंधित गावातील कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक आदी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शन करतील.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा शासन निर्णय येथे पहा

आणखी सरकारी योजना वाचा
नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.
Previous Post Next Post