प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) संपूर्ण माहिती | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana

देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार तसेच राज्य शासन वेगवेगळ्या सरकारी योजना राबवीत असते, त्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबाना सुरक्षितेची हमी देणारी केंद्र सरकारची Pradhan Mantri Suraksha Bima Yojana (प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना) व Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana (प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना) Insurance Policy मध्ये वार्षिक 20 रुपये व 436 रुपये  इतक्या अत्यल्प वार्षिक हप्त्यामध्ये कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास वारसांना 200000 रुपये बिमा लाभ देण्यात येतो, या आर्टिकल मध्ये आपण PMJJBY आवश्यक पात्रता, अर्ज कोठे करावा?, लाभ , क्लेम इतर संपूर्ण Details सविस्तर पाहूया.

प्रधानमंत्री बीमा योजना काय आहे? | Pradhan Mantri Bima Yojana

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana

प्रधानमंत्री बीमा योजना ही केंद्र शासनाची एक कुटुंबाना सुरक्षतेची हमी देणारी योजना आहे. यामध्ये दोन प्रकारच्या बिमा योजनेचा समावेश आहे. Pradhan Mantri Insurance Policy Yojana मध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना (PMJJBY) व प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY) या विमा योजनेचा समावेश होतो. प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेची संपूर्ण माहिती घेऊया..

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना माहिती | PMJJBY Details

प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना (PMJJBY) ही केंद्र सरकारने 2015 साली सुरु केलेली एक महत्वपूर्ण बिमा योजना आहे. या योजनेमध्ये वार्षिक फक्त 436 रुपये Premium भरून या विमा योजनेचा लाभ घेता येतो. PMJJBY Policy ही केंद्र सरकारची असल्यामुळे कुटुंबाना सुरक्षितेची हमी मिळते, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या वारसदारांना 2 लाखाचा विमा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास दिले जातात.

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचे फायदे | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Benefits

देशातील नागरिकांना अत्यल्प वार्षिक हप्ता भरून PMJJBY या बिमा योजनेचा लाभ घेता येतो. यामध्ये गरीबातला गरीब व्यक्ती सुद्धा हा Premium वार्षिक हप्ता भरू शकेल इतक्या कमी रकमेचा आणि विशेष म्हणजे सहज आणि सोप्या पद्धतीने भरता येईल आणि क्लेम देखील सहजपणे करता येतो.

  • PMJJBY ही केंद्र सरकारची कुटुंबाना सुरक्षितेची हमी देणारी विमा योजना आहे.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेत वार्षिक फक्त 436 रुपये भरून हा विमा खरेदी करता येतो.
  • PMJJBY या विमा लाभार्थ्यांच्या वारसांना 2 लाख रुपये विमा कवच प्रदान केले जाते.
  • प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही बँकेत आपले बचत ठेव खाते असल्यास या योजनांचा लाभ घेता येतो. 
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा वार्षिक हप्ता भरल्यानंतर 45 दिवसानंतर हा विमा लागू होतो.
  • PMJJBY विमा योजनेतील लाभार्थ्यांचे कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास हा विमा लागू आहे.
  • प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजनेचा वार्षिक हप्ता दरवर्षी 31 मे पर्यंत भरता येतो, आणि 1 जून पासून ही विमा योजना लागू होते.
  • या विमा योजनेत स्वयंचलीत (Auto Debit) वार्षिक हप्ता भरण्याची सुविधा दिली जाते.

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना आवश्यक पात्रता

  • ज्या नागरिकांचे वय 18 ते 50 आहे असे सर्व व्यक्ती प्रधानमंत्री जीवनज्योती बिमा योजनेत सहभागी होवू शकतात.
  • कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांपैकी कोणत्याही बँकेत बचत ठेव खाते (Savings Account) असणे आवश्यक आहे.
  • बँक अकाऊट ला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
  • बँक अकाऊंट सुरु असणे आवश्यक आहे.
  • दरवर्षी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना वार्षिक हप्ता भरणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे कोणत्याही बँकेत Savings Account असणे आवश्यक आहे. व तुमच्याकडे अपडेट स्वरूपातील आधारकार्ड, पॅनकार्ड  हे एकमेकांना लिंक असणे आवश्यक आहे. तसेच बँक पासबुक, मोबाईल नंबर (बँकेत रजिस्टर असलेला) सुरु असणे आवश्यक आहे. 

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजनेचा लाभ कसा घ्यावा? अर्ज कोठे करावा? | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Online Apply

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना खरेदी करण्यासाठी तुम्हाला दोन प्रकारे अर्ज करता येतो, त्यामध्ये एक तुम्ही बँकेत जाऊन प्रत्यक्ष  अर्ज करू शकता किंवा Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Online पद्धतीने Apply करू शकता.

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना ऑफलाईन अर्ज | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Offline Application

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा (PMJJBY) योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष बँकेत जाऊन फॉर्म भरून द्या. आणि PMJJBY योजना सुरु करून घ्या. किंवा

केंद्र सरकारच्या https://jansuraksha.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या, आणि तिथून PMJJBY योजनेचा मराठी मधील PDF FORM डाउनलोड करा आणि तो भरून बँकेत जमा करा. त्याचबरोबर संमतीपत्रक भरून जमा करा, अशा पद्धतीने तुम्ही Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Offline Application करू शकता.

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना ऑनलाईन अर्ज | Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Online Apply

प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे तुम्ही ज्या बँकेचे खातेदार आहात, त्या बँकेचे इंटरनेट बँकिग सेवा सुरु असणे आवश्यक आहे.

  • प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना Online Apply करण्यासाठी तुम्ही Internet Banking द्वारे Login करून PMJJBY बिमा खरेदी करू शकता.
  • त्यासाठी तुम्ही ज्या बँकेची Internet Banking सेवा वापरत आहात, त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगीन करा
  • कोणत्याही बँकेची इंटरनेट बँकिंग सुविधा वापरताना लॉगीन केल्यानंतर तिथे Services नावाची एक सुविधा असते, त्यावर क्लिक करा
  • त्यांनतर तुम्हाला ‘Social security schemes (PMJJBY, PMSBY, APY, SSY) चे पर्याय दिसतील त्यातून तुम्ही PMJJBY म्हणजेच Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana Online Apply करू शकता.

नवनविन अपडेट साठी  ग्रुप जॉईन करा

                                                              
Previous Post Next Post