अखेर ! कृषी सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ; मानधन वाढीचा शासन निर्णय निघाला...

Government Employee Salary News : महाराष्ट्र राज्यात ग्रामसेवक, शिक्षणसेवक यांच्या मानधनात भरीव वाढ केल्यानंतर आता राज्यातील कृषीसेवकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे, कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याची घोषणा मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती, आता प्रत्यक्ष दिनांक  1 ऑगस्ट 2023 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

$ads={1}

अखेर ! कृषी सेवकांच्या मानधनात भरघोस वाढ

Government Employee Salary News

सन २००९ मध्ये लागू करण्यात आलेल्या सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार नियमित कृषि सहायकांच्या वेतनात वाढ झाली. नियमित कृषि सहाय्यकांची सर्व कर्तव्ये व जबाबदाऱ्या कृषि सेवक पार पाडत असल्यामुळे कृषि सेवकांच्या निश्चित वेतनात (एकत्रित मानधन) रु. २५००/- वरुन रु.६०००/- एवढी वाढ करण्यात आली होती. 

तेव्हापासून कृषि सेवक रु.६०००/- एवढया निश्चित वेतनावर काम करत होते. त्यामुळे सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने कृषि सेवकांच्या निश्चित वेतनात (एकत्रित मानधन वाढ) करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कृषि सहाय्यक संघटना व कृषि सेवकांकडून करण्यात येत होती. 

हे ही वाचा - जुलै च्या पगारात महागाई भत्ता रोखीने मिळणार - महाराष्ट्र - जुनी पेन्शन योजना लेटेस्ट न्यूज पहा - या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू

तद्नुषंगाने मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दि.२२.०९.२०२२ रोजी आयोजित बैठकीच्या इतिवृत्ताच्या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या कृषिसेवकांच्या निश्चित वेतनात(एकत्रित मानधन वाढ) करण्याच्या प्रस्तावावर मा. मंत्रीमंडळाच्या दि. २७.०७.२०२३ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार कृषिसेवकांच्या निश्चित वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कृषि विभागातील कृषि सेवकांच्या सध्या असलेल्या रु.६०००/- या निश्चित वेतनात (एकत्रि मानधन) रु.१६०००/- एवढी वाढ करण्यात आली आहे. सदरची निश्चित वेतनातील (एकत्रित मानधन) वाढ ही दि. १ ऑगस्ट, २०२३ पासून लागू करण्यात आली आहे. [शासन निर्णय]

जुनी पेन्शन योजना लेटेस्ट न्यूज पहा  
या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू

सरकारी अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post