Educational Video Making : शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन, स्पर्धेसाठी विषय, नावनोंदणी लिंक...

Educational Video Making : राज्यातील शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर प्रत्येकी  84 पुरस्कार व प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून नोंदणी सुरु झाली आहे, या स्पर्धेसाठी अटी, व्हिडीओ निर्मिती स्पर्धेचे विषय सविस्तर पाहूया..

राज्यातील शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचं आयोजन

Educational Video Making

शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शिक्षक-प्रशिक्षक स्तरावरील शिक्षक, मुख्याध्यापक यांचेसाठी राज्यस्तर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची खुल्या स्पर्धेचे शासनामार्फत आयोजन करण्यात आले आहे.

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेसाठी अटी

स्पर्धेसाठी आवश्यक अटी :- (कृपया अटी काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा)

 • स्पर्धेकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या ऑनलाईन https://scertmaha.ac.in/vcomp2023/ या संकेतस्थळास भेट देवून आपली सर्व माहिती अचूक भरावी.
 • उमेदवारांना कोणत्याही एका गटासाठीच अर्ज सादर करावा. एका उमेदवारास एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत.
 • ज्या शिक्षकानी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांना तालुका/जिल्हा/राज्य पातळीवरील निवड समितीत सदस्य म्हणून सहभाग घेता येणार नाही. 

उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर व व्हिडीओ अपलोड निकषानुसार त्यांचे प्रथम तालुका स्तरावर मूल्यमापन होईल. तालुका स्तरावरील यशस्वी उमेदवार जिल्हा स्तरावरील मूल्यमापनासाठी पाठविण्यात येतील. 

त्यानंतर जिल्ह्यातील यशस्वी उमेदवार राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी पाठविण्यात येतील. असे सर्व 36 जिल्ह्यातील उमेदवारांमधून योग्य उमेदवार राज्यस्तरावर राज्य स्तरीय निवड समिती मार्फत निवडून त्याना पारितोषिके देण्यात येतील.

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती - विषय

खालीलपैकी एका प्रकारावरील व्हिडीओ तयार करावा

 1. कोणत्याही सॉफ्टवेअरचा वापर करून स्वतः व्हिडीओ तयार करणे.
 2. स्वत: स्क्रीन रेकोर्ड करून तयार केलेला व्हिडीओ
 3. स्वत केलेला Animated व्हिडिओ
 4. स्वत पेन टॅबलेटचा वापर करून बनवलेला व्हिडीओ.
 5. Immersive eContent (Augmented Reality Virtual Reality Virtual Lab/360 Degree / Simulations) वर आधारित व्हिडीओ
 6. खेळावर आधारित व्हिडीओ (Gamification)
 7. ई-चाचणीवर आधारित व्हिडीओ (E-assessments)
 8. शासन प्रणालीवर आधारित बोलीभाषेतून केलेला व्हिडीओ
 9. दिव्यांगत्व प्रकारानुसार अध्ययनासाठी व्हिडीओ [निर्मितीसाठी आयडिया पहा]
 10. राज्य / राष्ट्रीय शिष्यवृत्ती वर आधारित व्हिडिओ

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती नाव नोंदणी

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेची नोंदणी व व्हिडीओ अपलोड प्रक्रिया दिनांक 1 ऑगस्ट 2023 पासून सुरु होणार आहे. तर दिनांक 31 ऑगस्ट 2023 पर्यंत सदर लिंक सुरु असणार आहे. 

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती नाव नोंदणी येथे करा - https://scertmaha.ac.in/vcomp2023/

शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती रोख पारितोषिके व प्रमाणपत्र तपशील GR पहा
शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती आयोजन परिपत्रक PDF येथे पहा

Previous Post Next Post